शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या गलथान कारभाराचा रहिवाशांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:52 IST

वर्षभरात आगीच्या पाच घटना

डोंबिवली : एमआयडीसीतील निवासी विभागामध्ये महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत आहे. वर्षभरात त्या परिसरात पाच वेळा ट्रान्सफॉर्मर स्फोट होण्याच्या व तारांना आगी लागल्याचा घटना घडल्या आहेत. परंतु, तरीही जुनाट उपकरणांची देखभाल व दुरुस्ती होत नसल्याने वाढत्या अपघातांचे महावितरणला गांभीर्य नसल्याची टीका रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.अनेक ठिकाणी रस्त्यावरील डीपी बॉक्सची झाकणे,दरवाजे गायब झाली असून त्यांच्या केबल जमिनीचा सुरुवातीचा काही भागात वरती, उघड्यावर असल्याने यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वीजवाहिनीचे लोखंडी खांब आणि त्याला लटकवून टाकण्यात येणारी स्टे वायर गंजून गेल्या असून मागील कित्येक वर्षांत त्यांना रंगरंगोटी झाली नाही आहे. खांबांना आधार असणाऱ्या स्टे वायर काही ठिकाणी तुटल्याने ते खांब कधीही धोकादायक बनू शकतात. निवासी भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याने या सर्वांची नियमित देखभाल, दुरुस्ती होणे गरजेचे आहे. पण विविध कारणे सांगून महावितरण जनतेची दिशाभूल करीत आहे. वीजदेयक काही कारणाने वेळेत भरली गेली नाहीत तर लगेच वीजजोडणी तोडण्यासाठी महावितरणचे कर्मचारी तत्परता दाखवत असतात. पण तीच सतर्कता देखभाल, दुरुस्ती कामात का दाखवत नाही, असा सवाल त्यांनी महावितरणला उद्देशून केला. आता मोठ्या दुर्घटनेनंतर महावितरणला जाग येणार का? असेही ते म्हणाले.याबाबत मिलापनगरच्या रहिवाशांनी वारंवार महावितरणच्या एमआयडीसी कार्यालयातील अधिकाऱ्यांना याची फोटोसह माहिती दिली असूनही ते यावर दुर्लक्ष करीत असल्याचे रहिवासी राजू नलावडे यांचे म्हणणे आहे. येत्या पावसाळ्यात अपघात झाल्यास त्यामुळे या ठिकाणी भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

टॅग्स :mahavitaranमहावितरण