शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
2
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
3
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
4
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
5
Latest Marathi News LIVE Updates: खासदार सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागण्या काय?
6
अमेरिकेचे सैन्य, इराणचे महाकाय जहाज; होर्मुझ सामुद्रधुनी सहा तास संघर्ष आणि घेतले ताब्यात; व्हिडीओ पहा
7
Video - हृदयस्पर्शी! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नवजात बाळांना कुशीत घेऊन पळाली नर्स
8
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
9
इंधन-गॅसचा पुरवठा लवकरच सुरळीत होणार? शनिवारी २० जहाजांनी पार केले होर्मुझ...
10
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
11
सूट-बूट घालून आला, पाहुण्यांमध्ये मिसळला अन् ५ लाख घेऊन पळाला; Video पाहून बसेल धक्का
12
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
13
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
14
‘विकसित भारत संकल्पात पालघरचा सहभाग हवाच’ राज्यपालांच्या हस्ते डहाणूत आरोग्यसेवांचे लोकार्पण
15
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
16
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
17
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
18
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
19
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
20
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात केडीएमसीची धडक कारवाई

By मुरलीधर भवार | Updated: April 18, 2026 21:49 IST

शुक्रवारी फेरीवाला पथक घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी पाेहचले होते.

- मुरलीधर भवार 

डोंबिवली : घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात केडीएमसीने फेरीवाल्याच्या विरोधात शुक्रवारी कारवाई केली होती. या कारवाईच्या वेळी केडीएमसी अधिकाऱ्यावर बांबूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर केडीएमसीचे कारवाई पथक आज पु्न्हा सगळा फौजफाटा घेऊन पेंढरकर कॉलेज परिसरातील पोहचले. आज फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई करण्यात आली. त्याठिकाणच्या जवळपास ४० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

शुक्रवारी फेरीवाला पथक घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी पाेहचले होते. त्याठिकाणी कारवाईस एका सँडविच विक्रेत्याने तीव्र विरोध केला. अधिकारी सुरेश कामराज याला बांबूने मारहाण केली. या घनटेत सुरेश कामराज जखमी झाले. त्यामुळे  पथकाला काल कारवाई न करताच माघारी फिरावे लागले होते. फेरीवाल्यांचा कारवाईस झालेला विरोध पाहता महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बाेरकर यांनी आज फेरीवाला हटाव पथकासह सगळा फौजफाटा घेऊन घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरातील सगळया फेरीवाल्यांच्या विरोधत धडक कारवाई केली. आजही फेरीवाल्यांनी कारवाईस विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज त्यांचा विरोध कारवाई पथकाने हाणून पाडला. सगळे फेरीवाले पिटाळून लावण्यात आले. यावेळी काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गावर गंभीर आरोप केले. फेरीवाल्यांकडून महापालिकेचे कारवाई पथक पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हा आरोप प्रशासनाने फेटाळून लावला. जवळपास ४० टपऱ्या हटविण्याची कारवाई आज करण्यात आली.

घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांनी रस्ते अडविले आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होतो. विशेष म्हणजे पेंढरकर कॉलेजच्या गल्लीत एक मोठी खाऊ गल्ली तयार झाली आहे. काही जणांनी त्यांची हॉटेल आणि स्टॉल टेम्पो गाडीत थाटली आहेत. कारवाई पथक येताच गाडी घेऊन ही मंडळी पसार होतात.  एकाने डबल डेकर बस स्वरुपात छोटे खानी हॉटेल थाटले होते. त्याला रोषणाई केली आहे. ती गाडी आज कारवाईच्या वेळी त्याठिकाणी नव्हती. मात्र त्याच प्रकारची गाडी आत्ता काटई-अंबरनाथ राेडवरील हेदूटणे गावाच्या पुढे उभी असते. 

English
हिंदी सारांश
Web Title : KDMC cracks down on illegal vendors near Pendharkar College, Dombivli.

Web Summary : KDMC intensified action against illegal vendors near Pendharkar College after an official was attacked. Around 40 stalls were removed. Allegations of bribery against KDMC officials were denied. Traffic obstruction was caused by these vendors.
टॅग्स :kalyanकल्याण