कल्याण : कल्याण डोंबिवली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची बुधवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. नगरविकास खात्याने सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांना महापालिकेत प्रतिनियुक्तीवर कल्याण डोंबिवली महापालिकेत पाठविले होते. त्यांची प्रतिनियुक्ती संपूष्टात करण्यात आल्याचे आदेश नगरविकास खात्याने काढले आहे. त्यांच्या उपायुक्त पदाचा पदभार अद्याप कोणाला दिलेला नाही. तसेच त्यांची बदली कुठे करण्यात आली याचे स्वतंत्र आदेश काढले जातील असे नगरविकास खात्याने म्हटले आहे.
कोरोना काळात कोकरे यांच्याकडे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त पदाचा पदभार होता. या काळात त्यांनी शहरात शून्य कचरा मोहिम राबविण्याचे प्रयत्न केले. तसेच आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकणे बंद करण्याचे काम हाती घेतले होते. तसेच डंपिंगवरील कचरा बायोमायनिंग पद्धतीने करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यासाठी सरकारने निधी मंजूर केला. आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची प्रक्रिया खाजगी कंत्राटदाराकडून सुरु आहे. त्याचे पहिल्या टप्प्यातील काम मार्गी लागले आहे. दरम्यान कोकरे यांनी लातूर पालिकेत बदली झाली. लातूर पालिकेतून त्यांची बदली संगमनेर पालिकेत झाली. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने २३ सप्टेंबर रोजी पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे. त्यांनी पुन्हा कल्याण डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा पदभार घेतल्यानंतर शहर कचरा मुक्त करण्याचे काम सुरु केले. मात्र दरम्यानच्या काळात महापालिका हद्दीतील कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट सुमित एल्को प्लास्ट या कंपनीला दिले गेले.या कंपनीवरुन भाजप आणि शिंदे सेनेत वाद आहे. कचरा उचण्याचे काम व्यवस्थित केले जात नसल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. तर सुमित एल्को प्लास्ट कंपनीला आणण्यामागे शिंदे सेना आहे. भाजप आणि शिंदे सेनेतील वरच्या पातळीच्या वादाचा फटका कोकरे यांना बसला आहे. त्यामुळे त्यांची तडकाफडकी बदली झाली असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तूळात केली जात आहे. कोकरे यांच्या बदली पश्चात आत्ता घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणा आहे. उपायुक्त भाजप कि शिंदे सेनेच्या मर्जीतील येणार ? याविषयीची चर्चा आहे.दरम्यान माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे यांनी नगरविकास आणि महापालिका आयुक्तांकडे कोकरे यांची तक्रार केली होती.ब प्रभागातील ४० कर्मचारी हे आय प्रभागात पाठविले होते. कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट सुमित एल्को प्लास्टला दिले असताना त्या कामगारांचा पगार सुमित कंपनीने देणे अपेक्षित आहे. तो पगार महापालिकेच्या खात्यातून दिला गेला आहे. त्यामुळे महापालिकेचे जवळपास २५ ते २८ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही रक्कम कोकरे यांच्या पगारातून वसूल केली जावी अशी मागणी ताटे यांनी केली होती.
Web Summary : Ramdas Kokare, KDMC's solid waste management deputy, was suddenly transferred. Internal politics and allegations of financial irregularities are speculated reasons. A replacement is awaited.
Web Summary : केडीएमसी के ठोस कचरा प्रबंधन उपायुक्त रामदास कोकरे का अचानक तबादला कर दिया गया। आंतरिक राजनीति और वित्तीय अनियमितताओं के आरोपों को कारण बताया जा रहा है। प्रतिस्थापन का इंतजार है।