केडीएमटी बसच्या खिडकीत घुसला पत्रा

By मुरलीधर भवार | Updated: May 4, 2026 20:50 IST2026-05-04T20:50:12+5:302026-05-04T20:50:45+5:30

या घटनेत कोणतीही जिवित हानी झालेली नाही.

iron barricading piece enters KDMT bus window | केडीएमटी बसच्या खिडकीत घुसला पत्रा

केडीएमटी बसच्या खिडकीत घुसला पत्रा

मुरलीधर भवार, कल्याण : कल्याण पश्चिमेतील के.सी. गांधी शाळेनजीक असलेल्या पेट्रोप पंपाच्या ठिकाणी केडीएमटीची बस वळ घेत असताना मेट्रो रेल्वेच्या कामासाठी लावण्यात आलेलया बेरिगेटचा पत्रा बसच्या खिडकीत घुसल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेत कोणतीही जिवित हानी झालेली नाही. बसमध्ये प्रवासी नसल्याने जिवित हानी टळली आहे. मात्र रस्त्यावर वाहतूकीचा जास्त ताण आहे. या रस्त्यावर मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. याठिकाणी ठेकेदाराने बेरिगेटचा लावलेल्या आहेत. त्याचा पत्रा बसच्या खिडकीत घुसतो. यात ठेकेदाराची चुक आहे की, केडीएमटी बस चालकाची ? असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी हीच घटना अन्य वाहन चालकांसोबतही घडू शकते.

काही महिन्यांपूर्वी कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेला एक आधार खांब एका दिशेने झुकल्याची घटना घडली होती. त्यानंतर आजही पत्रा बसच्या खिडकीत घुसल्याची घटना घडली. त्यामुळे ठेकेदारांकडून सुरक्षिततेची काळजी घेतली गेली नसल्याची बाब उघड झाली आहे.

Web Title : कल्याण में केडीएमटी बस की खिड़की में घुसा पतरा

Web Summary : कल्याण में मेट्रो निर्माण के दौरान केडीएमटी बस की खिड़की में पतरा घुस गया। बस में यात्री नहीं थे, जिससे हादसा टल गया। घटना मेट्रो कार्य की सुरक्षा और ठेकेदार की लापरवाही पर सवाल उठाती है।

Web Title : KDMT bus window pierced by sheet metal in Kalyan

Web Summary : A KDMT bus in Kalyan had a close call when a sheet metal from metro construction pierced its window. No passengers were on board, averting potential tragedy. The incident raises safety concerns regarding the ongoing metro work and contractor negligence.