शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
3
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
4
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
5
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
6
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
7
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
8
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
9
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
10
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
11
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
12
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
14
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
15
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
16
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
17
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
18
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
19
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
20
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
Daily Top 2Weekly Top 5

आपण यांना पाहिलं का?; उद्धवसेनेने लावले 'नॉट रिचेबल' नगरसेवकांचे पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 12:55 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून आलेल्या उद्धवसेनेचे ११ पैकी ४ नगरसेवक काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' आहेत. त्यापैकी दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेत निवडून आलेल्या उद्धवसेनेचे ११ पैकी ४ नगरसेवक काही दिवसांपासून 'नॉट रिचेबल' आहेत. त्यापैकी दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती. आता त्या दोघांचेही फोटोपोस्टर उद्धवसेनेने सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लावले असून, संबंधितांची माहिती मिळाल्यास शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

कल्याण पूर्वेतील मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्यांच्याशी संपर्क झालेला नाही.

पोलिसांकडून तपास होत नसल्याचा आरोप पोलिसांकडून तपास होत नसल्याचा आरोप उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे, तसेच उद्धवसेनेचे कल्याण पश्चिमेतील राहुल कोट आणि स्वप्नाली केणे यांच्याशीही संपर्क नाही. ते मनसेच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या दोघांबाबत मात्र उद्धवसेनेने अजून आक्रमक भूमिका घेतलेली नाही. यासंदर्भात उद्धवसेनेचे कल्याण पश्चिमचे शहरप्रमुख बाळा परब यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

अवतरण चिन्ह मजकूर:

पश्चिमेतील राहुल कोट आणि स्वप्नाली केणे या दोन बेपत्ता झालेल्या नगरसेवकांबाबत आम्ही खडकपाडा आणि महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली आहे. लवकरच त्यांची छायाचित्रे पोस्टर स्वरूपात लावली जाणार आहेत. - बाळा परब, शहरप्रमुख उद्धवसेना, कल्याण पश्चिम

अशाप्रकारे पोस्टर लावणे बदनामी मधुर म्हात्रे हे उद्धवसेनेतच आहेत. ते विपश्यनेला गेले आहेत. तेथे फोन वापरण्याची परवानगी नाही, अशी पोस्ट मधुर यांनी केली आहे; परंतु आम्हाला न विचारता त्यांचे असे पोस्टर लावता ही बदनामी आहे. या संदर्भात आम्ही पोलिसांत तक्रार दिली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांचे नातेवाईक दिव्येश म्हात्रे यांनी दिली आहे. दरम्यान, चारही बेपत्ता नगरसेवकांना व्हिप बजावला जाणार असल्याचे उद्धवसेनेचे आ. वरुण सरदेसाई यांनी मुंबईत पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६kalyanकल्याण