शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

रेल्वेने बजाविलेल्या नोटिसांच्याविरोधात हायकोर्टात जाणार, माजी नगरसेवक नितीन निकम यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 20:21 IST

Former Corporator Nitin Nikam warns : रेल्वेने नागरीकांना बजाविलेल्या नोटिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिला आहे. 

कल्याण - सर्वोच्च न्यायालयाने सरकारी जमीनीवरील अतिक्रमणो हटविण्याचे आदेश दिल्याने मध्य रेल्वेनेकल्याण येथील रेल्वेच्या जागेवरील वास्तव करणा:या नागरीकांना नोटिसा बजावल्या आहे. रेल्वेने नागरीकांना बजाविलेल्या नोटिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिला आहे. 

कल्याण पूर्व भागातील रेल्वेच्या जागेतील जवळपास हजारो नागरीकांना रेल्वे प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या जागेत नागरीक गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करुन आहेत. ते कर भरतात. वीज बील आणि पाणी बील भरतात. साठ दिवसाच्या आत त्यांनी त्यांची घरे खाली करण्याची नोटिस न्यायालयाचा हवाला देत रेल्वेकडून बजावण्यात आली आहे. या नोटिसांच्या विरोधात नागरीक एकत्रित जमले होते. त्याठिकाणी माजी नगरसेवक निकम आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी धाव घेतली. नागरीकांच्या हाती नोटिसा पाहून हे नगरसेवक हवालदिल झाले आहे. कोरोनातून सामान्य नागरीक आत्ता  कुठे सावरत असताना त्याला घर खाली करण्याची नोटिस बजावल्याने नागरीकांनी जायचे कुठे असा संतप्त सवाल निकम यांनी उपस्थीत केला आहे.

या प्रकरणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडेहा विषय मांडण्यात येणार आहे. कारण खासदारांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बैठकीची मागणी केली आहे. दानवे यावर काय निर्णय घेतातत याकडे सगळ्य़ाचे लक्ष लागले असले तरी रेल्वेने या नागरीकांचे पुनर्वसन केले पाहिजे. रेल्वेच्या जागेतील नागरीकांना हटविण्यासंदर्भात यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्यासोबत बैठक घेतली होती. रेल्वेच्या जागेतील बाधितांना एसआरए योजनेत समाविष्ट करण्याचा धोरणात्मक निर्णय झाल्याचा दाखला माजी नगरसेवक निकम यांनी देत कल्याणमधीलही नागरीकांच्या पुनर्वसनासाठी एसआरए योजना राबवून त्यांचे पुनर्वसन करावे. मध्य रेल्वेने विविध ठिकाणी प्रवाशांच्या सोयी सुविधाकरीता प्रकल्प राबवित आहे. काही ठिकामी होम प्लॅटफॉर्म विस्तारीत केले जात आहे. कल्याण रेल्वे स्थानकाचे तर रिमॉडेलिंग होणार आहे. त्यासाठी या जागा खाली करण्याकरीता रेल्वेने नोटिसा पाठविल्या आहेतत. रेल्वेच्या विकास कामाला विरोध नाही. पण आधी पूनर्वसन करा. मगच प्रकल्प राबवा अशी नागरीकांची भूमिका आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयkalyanकल्याणSupreme Courtसर्वोच्च न्यायालयrailwayरेल्वे