सेंट जोसेफ स्कुलनजीकच्या ट्रान्सफॉर्मरला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 14:47 IST2021-01-01T14:47:08+5:302021-01-01T14:47:30+5:30
Fire : एकसारख्या ट्रान्सफॉर्मरला आगी का लागतात याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून झाली पाहिजे अशी मागणी रहिवाश्यांनी केली.

सेंट जोसेफ स्कुलनजीकच्या ट्रान्सफॉर्मरला आग
ठळक मुद्देमहावितरणने यातून काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येते.
डोंबिवली - मिलापनगर एमआयडीसी, सेंट जोसेफ स्कूलजवळील मोठ्या ट्रान्सफॉर्मरला शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजता आग लागली असून महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून त्यानं वीज प्रवाह खंडित केला असून आता आग आटोक्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात या ट्रान्सफॉर्मरला तिसऱ्यांदा आग लागली असून यापूर्वी निवासी मधील अनेकदा काही ट्रान्सफॉर्मरला आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत. महावितरणने यातून काहीच बोध घेतला नसल्याचे दिसून येते. एकसारख्या ट्रान्सफॉर्मरला आगी का लागतात याची चौकशी वरिष्ठ पातळीवरून झाली पाहिजे अशी मागणी रहिवाश्यांनी केली.