इमारतीच्या डकमध्ये सापडलं नवजात बाळ; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 16:24 IST2024-11-21T16:23:45+5:302024-11-21T16:24:51+5:30
अंबरनाथमध्ये एका इमारतीच्या डकमध्ये स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

इमारतीच्या डकमध्ये सापडलं नवजात बाळ; अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार
Ambernath Crime :अंबरनाथमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. अंबरनामध्ये एका स्त्री जातीच्या अर्भकाला इमारतीवरुन खाली फेकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. या घटनेमुळे इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाची आता कसून चौकशी करत आहेत.
अंबरनाथ पश्चिमेच्या शंकर हाइट्स या इमारतीत सकाळच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. एका नवजात स्त्री अर्भकाला इमारतीवरून फेकल्याने खळबळ उडाली. नवजात बाळ इमारतीच्या डकमध्ये आढळल्यानंतर पोलिसांना याबद्दल माहिती देण्यात आली. या प्रकरणी दोन संशयित महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. तसेच हे बाळ कुमारी मातेचं होतं का? यासंदर्भातही पोलिसांकडून तपास सुरु आहे.
इमारतीमधील रहिवाशांनी हे बाळ डकमध्ये पाहिल्यानंतर याची माहिती स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांना दिली. उमेश पाटील यांनी तात्काळ पोलिसांना या सगळ्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. रात्रीच्या सुमारास हे स्त्री अर्भक जन्माला आलं असून त्याला तिथून फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी हे बाळ ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात पाठवलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.