शहाडमध्ये लांबपल्याच्या रेल्वे गाडीखाली वृद्धाची आत्महत्या
By अनिकेत घमंडी | Updated: September 6, 2023 20:31 IST2023-09-06T20:30:09+5:302023-09-06T20:31:11+5:30
मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने लांबपल्याच्या गाडीखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी शहाड रेल्वे स्थानकात घडली.

शहाडमध्ये लांबपल्याच्या रेल्वे गाडीखाली वृद्धाची आत्महत्या
डोंबिवली : मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने लांबपल्याच्या गाडीखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी शहाड रेल्वे स्थानकात घडली. त्याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. प्रकाश करतामल चंचलानी (६३) असे त्या मयत जेष्ठ नागरिकाचे नाव असून तो उल्हासनगर येथील राहणारा असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिली. ते म्हणाले की, सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच त्या घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांनी जाऊन खातरजमा।केली, पण त्या आधीच चंचलानी यांचा मृत्यू झाला होता.
कल्याण ते शहाड रेल्वे स्टेशन दरम्यान कि.मी. ५३/३३६जवळ गाडी नं. १८०३० या मेल गाडीखाली त्यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांच्या वारसांचा शोध घेण्यात वेळ गेला, दुपारनंतर ओळखप्रक्रिया पूर्ण करून मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला. लोहमार्ग मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार चंचलानी हे काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते त्याच अवस्थेत त्यांनी हे पाऊल उचलले असावे असे सांगण्यात आले, लोहमार्ग पोलीस पुढील तपास करत आहेत. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत या वर्षभरात जानेवारी ते आतापर्यंत सुमारे २१९ जणांचा विविध कारणांनी रेल्वे अपघातात मृत्यू झाला असल्याची नोंद आहे. तेवढ्याच प्रमाणात अपघाती जखमींची नोंद असल्याचे सांगण्यात आले.