डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल - श्रीकांत शिंदे

By अनिकेत घमंडी | Published: April 14, 2023 02:46 PM2023-04-14T14:46:55+5:302023-04-14T14:48:52+5:30

डॉ .बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव - कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने पूर्वेतील प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात या अभिवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Dr. Babasaheb Ambedkar Memorial will be an inspiration for many generations to come - Shrikant Shinde | डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल - श्रीकांत शिंदे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल - श्रीकांत शिंदे

googlenewsNext

कल्याण - गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कल्याण पूर्वेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम निव्र गतीने होत असून हे स्मारक पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना केले .

डॉ .बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव - कल्याण पूर्व यांच्या विद्यमाने पूर्वेतील प्रभाग ड कार्यालयाच्या प्रांगणात या अभिवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खा. शिंदे म्हणाले की, आजचा दिवस हा पूर्वेतील आंबेडकरी जनतेसाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा आहे कारण आंबेडकर स्मारकाचे स्वप्न पूर्णत्वात उतरत आहे. या स्मारकातून डॉ. बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची प्रेरणा पुढील पिढ्यांना मिळणार आहे . पुढील वर्षी नव निर्मित स्मारकात भव्य दिव्य स्वरुपात जयंती उत्सव साजरा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

स्मारक निर्मितीतीत आमदार गणपत गायकवाड आणि येथील जनतेचाही तितकाच वाटा आहे, स्मारकाच्या निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्या सर्वांचे खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी आभार मानले . यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की,स्मारकाच्या निर्मितीसाठी सर्वांना सोईची अशी मीच जागेची निवड केली हाती, आणि जागेचा प्रश्न सुटला नसता तर स्मारक निर्मिती झाली नसती म्हणून जागेसह अन्य ज्यांनी ज्यांनी स्मारक निर्मितीची मागणी केली आणि  हातभार लावला त्या सर्वांचे आभार मानलेच लागतील .आमदार, खासदार यांच्या प्रयत्नाने आणि भिमसैनिकांच्या रेट्याने उभे रहात असलेले स्मारक हे कल्याण नगरीचे भूषण असून या स्मारकाला भविष्यात पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त होईल असा विश्वास  सिंधू मेश्राम यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला .
 

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Memorial will be an inspiration for many generations to come - Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.