शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमधील रस्त्याला दिले केडीएमसीच्या उपायुक्तांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 00:18 IST

कचरामुक्त डम्पिंग ग्राउंडची राबविली होती संकल्पना

कल्याण : माथेरान नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करीत असताना कचरामुक्त डम्पिंग ग्राउंडची संकल्पना राबवून ती यशस्वी करणारे आणि सद्य:स्थितीला केडीएमसीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले रामदास कोकरे यांचे नाव रस्त्याला देऊन माथेरान गिरीस्थान नगरपालिकेने त्यांचा विशेष सन्मान केला आहे.कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत रुजू होण्यापूर्वी माथेरान गिरीस्थान नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार रायगड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकरे यांच्याकडे सोपविला होता. त्यांनी, तत्पूर्वी वेंगुर्ला व कर्जत येथे त्यांच्यामार्फत राबविलेली ‘कचरामुक्त डम्पिंग ग्राउंड’ ही संकल्पना महाराष्ट्राचे मिनी हिल स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माथेरानमध्येही राबविली आणि ती यशस्वी करून दाखवली. कोकरे यांनी माथेरानमधील ‘डम्पिंग ग्राउंड’चे रूपांतर ‘खेळाच्या मैदाना’त केले तसेच माथेरानच्या पर्यावरणपूरक सर्वांगीण विकासात भरीव योगदान दिल्याबाबत माथेरान गिरीस्थान नगरपालिका हद्दीतील ‘सेटविला नाका ते कचरा डेपो’ या रस्त्याचे नामकरण ‘श्री. रामदास तुकाराम कोकरे मार्ग’ असे करून कोकरे यांच्या कार्याचा गौरव केला.नामकरणाच्या उद्घाटन सोहळ्यास तत्कालीन रायगड जिल्हाधिकारी व विद्यमान केडीएमसीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, माथेरानच्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त उमाकांत गायकवाड, माथेरान नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव व इतर मान्यवर हे व्हीसीद्वारे उपस्थित होते. दरम्यान, केडीएमसीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त म्हणून रुजू झाल्यापासून कोकरे यांनी ‘शून्य कचरा मोहीम’ राबविण्यासाठी अनेक अभिनव संकल्पना राबविल्या आहेत. सरकारी अधिकारी म्हटले की आपल्यासमोर लागलीच नकारात्मक किंवा एक विशिष्ट साचेबद्ध प्रतिमा उभी राहते. याला काही अधिकारी मात्र अपवादही असतात. कचऱ्यासारखा संवेदनशील विषय योग्य प्रकारे हाताळणाऱ्या आणि यशस्वी करून दाखविणाऱ्या कोकरेंचे काम इतरांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. इतरांनी त्यांचा आदर्श ठेवावा असे त्यांचे काम आहे.शून्य कचरा मोहिमेमुळे आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर जाणारा कचरा कमी झाला आहे. हा कचरा कमी करत भविष्यात आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी ते प्रयत्नशील असून तसे झाल्यास नागरिकांचा त्रास वाचणार आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMatheranमाथेरान