केडीएमटीच्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, मुख्यालयासमोर कामगारांचे लाक्षणिक उपोषण सुरु
By मुरलीधर भवार | Updated: June 13, 2024 15:13 IST2024-06-13T15:12:57+5:302024-06-13T15:13:28+5:30
संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह बुधाराम सरनौबत, अनिल पंडित आदींसह केडीएमटी कामगार लाक्षणिक उपाेषणात सहभागी झाले आहे.

केडीएमटीच्या कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी, मुख्यालयासमोर कामगारांचे लाक्षणिक उपोषण सुरु
कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीकरीता महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने आजपासून लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले आहे.
संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील यांच्यासह बुधाराम सरनौबत, अनिल पंडित आदींसह केडीएमटी कामगार लाक्षणिक उपाेषणात सहभागी झाले आहे. अध्यक्ष पाटील यांनी सांगितले की, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कामगारांची होती. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली. न्यायालयाने जुनी पेन्शन योजना लागू करा असे आदेश दिले आहे.
या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाच्या स्तरावर निर्णय घ्यावा असे सांगितले आहे. तरी देखील महापालिका निर्णय घेण्याबाबत चालढकल करीत आहे. आमची मागणी मान्य झाली नाही म्हणून आम्ही लाक्षणिक उपोषण करीत आहोत. या पुढे आणखीन उग्र आंदोलन करु असा इशारा पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.