धक्कादायक! शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेकडे केली शरीर सुखाची मागणी; पाठवले अश्लील मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 19:41 IST2026-03-26T19:10:04+5:302026-03-26T19:41:55+5:30

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवला असल्याची धक्कादायक घटना समोर आली.

crime news School trustee's son demands physical pleasure from teacher sends obscene messages | धक्कादायक! शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेकडे केली शरीर सुखाची मागणी; पाठवले अश्लील मेसेज

धक्कादायक! शाळा ट्रस्टीच्या मुलाने शिक्षिकेकडे केली शरीर सुखाची मागणी; पाठवले अश्लील मेसेज

डोंबिवलीतील एका शाळेत एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीतील एका शाळेच्या ट्रस्टीच्या मुलाने शाळेतील शिक्षिकेला अश्लील मेसेज पाठवून शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

१५ दरोड्यांचे प्रयत्न, यानंतर हरवलेल्या चाव्या! जगन्नाथ पुरीच्या 'रत्नभांडारात' नेमकं किती सोनं दडलंय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शाळेच्या ट्रस्टीचा मुलगा गेल्या काही दिवसांपासून शाळेतील एका शिक्षिकेला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवत होता. केवळ मेसेजवरच न थांबता, त्याने पीडित शिक्षिकेवर शरीरसंबंध ठेवण्यासाठी वारंवार दबाव टाकला. या जाचाला कंटाळून अखेर शिक्षिकेने आपल्या कुटुंबासह मनसे पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि घडलेला सर्व प्रकार सांगितला.

या घटनेची माहिती मिळताच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी थेट शाळा गाठली. तिथे उपस्थित असलेल्या ट्रस्टी आणि त्यांच्या पत्नीला जाब विचारला. "मुलाला कुठे लपवून ठेवले आहे? त्याला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा मनसे स्टाईलने धडा शिकवू," असा पवित्रा घेत कार्यकर्त्यांनी सुमारे एक तास शाळेत गोंधळ घातला. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून मानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी मुलाला घरातून घेतले ताब्यात

शाळेत सुरू असलेला गोंधळ पाहून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवली. ट्रस्टीचा मुलगा शाळेच्या शेजारीच असलेल्या घरात लपून बसला होता. पोलिसांनी तिथून त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या पीडित शिक्षिका, तिची आई आणि मनसे पदाधिकारी मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या घटनेमुळे डोंबिवलीत संतापाची लाट पसरली. सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Web Title : स्कूल ट्रस्टी के बेटे ने शिक्षिका से शारीरिक संबंध की मांग की, अश्लील संदेश भेजे

Web Summary : डोंबिवली में, एक स्कूल ट्रस्टी के बेटे पर शिक्षिका को अश्लील संदेश भेजने और शारीरिक संबंध बनाने की मांग करने का आरोप है। मनसे कार्यकर्ताओं ने विरोध किया, जिसके बाद पुलिस ने हस्तक्षेप किया और बेटे को गिरफ्तार कर लिया। इस घटना से आक्रोश है और सुरक्षा को लेकर चिंता बढ़ गई है।

Web Title : School Trustee's Son Demanded Sexual Favors from Teacher, Sent Obscene Messages

Web Summary : In Dombivli, a school trustee's son allegedly sent obscene messages and demanded sexual favors from a teacher. MNS activists protested, leading to police intervention and the son's arrest. The incident has sparked outrage and raised safety concerns.