शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
3
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
4
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
5
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
6
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
7
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
9
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
10
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
11
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
12
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
13
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
14
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
15
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
16
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
17
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
18
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
19
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
20
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर मोठ्या प्रमाणात निधी मिळायला सुरुवात"; निधीवरून शिंदे-चव्हाण यांच्यात जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 16:41 IST

शिवसेना शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील वादावर पडदा पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच डोंबिवलीत निधीवरुन जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

Ravindra Chavan VS Shrikant Shinde: पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या फोडाफोडीच्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पहिल्यांदाच एका मंचावर आल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवलीतील क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे एकत्र आले होते. या कार्यक्रमात कल्याण  डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना कल्याण डोंबिवलीच्या निधीवरुन रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदेंमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळाला असं विधान रवींद्र चव्हाण यांनी केलं. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर डोंबिवलीला निधी मिळायला सुरुवात झाल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपमधील संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे. डोंबिवली येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर आले असता, दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करत राजकीय वातावरण तापवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी डोंबिवली येथील वै.ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलाच्या पुनर्विकासाच्या कामाचे आणि सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन पार पडले. याच सोहळ्यात बोलताना दोन्ही नेत्यांमध्ये निधी आणि श्रेयवादावरून जोरदार जुंपली.

भाषणादरम्यान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या विरोधकांना टोला लगावत म्हटले की, "खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी अनेक जणांनी आजवर खड्डे खोदले, पण हा श्रीकांत आजवर कोणत्याही खड्ड्यात पडला नाही. उलट ज्यांनी हे खड्डे खणले, त्यांची अवस्था काय झाली हे सर्वांना माहिती आहे." महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या पदाधिकारी फोडाफोडीच्या राजकारणावरून शिंदे यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात आहे.

निधीवरून श्रेयवादाची लढाई

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीसाठी निधी आणण्याचे श्रेय भाजप-युतीच्या पूर्वीच्या सरकारला दिले. "हा बदल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि २०१४ च्या नंतरचा जो काळ होता. त्यावेळी देवेंद्र फडणवीस महायुतीचे मुख्यमंत्री झाले आणि मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएचा निधी हा ठाणे जिल्ह्यातील विविध योजनांसाठी मिळाला पाहिजे याची सुरुवात त्या काळात झाली," असं रवींद्र चव्हाण म्हणाले. 

श्रीकांत शिंदे यांचे प्रत्युत्तर

यावर श्रीकांत शिंदे यांनी त्वरित पलटवार करत सध्याच्या सरकारने दिलेल्या निधीवर जोर दिला. "उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमाने कल्याण डोंबिवलीतील अनेक विकासकामे पार पडत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवलीत निधी यायला सुरुवात झाली. २०१४ मध्ये मला पहिल्यांदा खासदार केलं. २०१४ च्या अगोदरची आणि आताची परिस्थिती कल्याण डोंबिवलीमधील लोक पाहत आहेत," असे सांगत त्यांनी सध्याच्या नेतृत्वाने अधिक निधी आणल्याचे स्पष्ट केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde-Chavan clash over funds after Shinde became Chief Minister.

Web Summary : A dispute erupted between Shinde and Chavan regarding fund allocation to Kalyan-Dombivli. Chavan credited past BJP-led governments, while Shinde emphasized the current government's increased funding since he became Chief Minister, sparking a political debate.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Ravindra Chavanरविंद्र चव्हाणShrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे