शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: सोशल मीडियावर व्हायरल  झालेला "तो"  मेसेज चुकीचा, कल्याणच्या तहसीलदारांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 17:47 IST

Coronavirus in Kalyan : कल्याण तालुक्यात 10  मे ते 14 मे पर्यंत कडक  निर्बंध लावण्याबाबतचे एक पत्रक शुक्रवारी  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या पत्रकामुळे नागरिकांमध्येही गोंधळ निर्माण झाला होता.

कल्याण - कल्याण तालुक्यात 10  मे ते 14 मे पर्यंत कडक  निर्बंध लावण्याबाबतचे एक पत्रक शुक्रवारी  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. या पत्रकामुळे नागरिकांमध्येही गोंधळ निर्माण झाला. कडक निर्बंधाबाबत शहरात  अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण तालुक्यात येत्या 10 मे पासून 14 मे पर्यंत कडक निर्बंध लावण्याबाबतचा केवळ प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आलेला आहे. यासंदर्भात ठाणे जिल्हाधिकारी निर्णय घेणार असून याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे  कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांनी "लोकमतशी" बोलताना स्पष्ट केलं आहे. तसेच सोशल मिडियावर व्हायरल झालेला मेसेजही चुकीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. कल्याण तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता खबरदारीचा उपाय म्हणून  कडक  निर्बंध लागू करण्याबाबतचा फक्त प्रस्ताव ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. प्रस्तावाची जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केलेली प्रत समोर न आणता केवळ कडक निर्बंधांचे पत्रच सोशल मीडियावर व्हायरल झाले. या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावर अंतिम निर्णय झाल्यास त्याची पूर्वसूचना  दिली जाईल  अशी माहिती दीपक आकडे यांनी दिली. व्हायरल झालेल्या पत्रावरून नागरिकांमध्ये प्रचंड  गोंधळ उडालेला असून कल्याण  तालुक्यासह कल्याण डोंबिवली शहरातही लॉकडाऊन होणार की काय अशा एक ना अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान कोणत्याही अफवांवर  विश्वास न ठेवण्याचं आवाहन  शासकीय यंत्रणांनी केले आहे.मात्र तहसील कार्यालयातली  महत्वाची कागदपत्रे  व्हायरल होतात कशी काय? हा प्रश्न मात्र  अनुत्तरितच आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याण