शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

coronavirus: कोरोनासाठी वैद्यकीय कर्मचारी भरती केल्याने ताण टळला, कल्याण-डोंबिवली महापालिका : ३९१ पदे भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 02:11 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर ही दोन बडी रुग्णालये असून, १५ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी अत्यावश्यक वैद्यकीय कर्मचारी भरण्याची प्रक्रिया २०१४ सालापासून सुरू आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेची रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर ही दोन बडी रुग्णालये असून, १५ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. या ठिकाणी अत्यावश्यक वैद्यकीय कर्मचारी भरण्याची प्रक्रिया २०१४ सालापासून सुरू आहे. मात्र त्याला योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर राज्याच्या परीक्षा महापोर्टलद्वारेच ही  पदे भरण्याची प्रक्रिया पार पाडली जावी, अशी अट असल्याने भरतीप्रक्रिया मागे पडत राहिली. त्यानंतर मार्च २०२०मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. आरोग्य यंत्रणा तुटपुंजी असल्याने महापालिकेने कोरोनाकाळापुरते कर्मचारी भरण्याची प्रक्रिया सुरू केली.  पहिल्या प्रयत्नात अल्पप्रतिसाद आला. मात्र त्यानंतर वाॅर्डबॉय आणि नर्स भरतीस चांगला प्रतिसाद मिळाल्याने कोरोना काळापुरती ही पदे भरलेली आहेत. मात्र, आता पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना या पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचे प्रयत्नही महापालिकेने सुरू केले आहेत. त्यामुळे आणखी पदे कायमस्वरूपी भरण्याची गरज भासणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची दोन बडी रुग्णालये आणि १५ नागरी आरोग्य सुविधा केंद्रे आहेत. त्यासाठी ११५ वैद्यकीय पदे मंजूर आहेत. वारंवार जाहिराती देऊनही त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्यापैकी केवळ ४५ पदे भरलेली आहेत. कोरोनाकाळात आपत्कालीन साथरोग नियंत्रणासाठी विविध पदांकरिता चारशे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ३९१ पदे भरली गेली आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ही पदे पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहेत.    - डॉ. अश्विनी पाटील,     मुख्य वैद्यकीय अधिकारी,     कल्याण डोंबिवली महापालिकावैद्यकीय अधिकारी एमडी     १वैद्यकीय अधिकारी पीजी     १वैद्यकीय अधिकारी जनरल     १वैद्यकीय अधिकारी आयुष     २५स्टाफ नर्स    ३६सहाय्यक नर्स     ४८नर्सिग असिस्टंन्स     ३९ईसीजी तंत्रज्ञ     ४लॅब तंत्रज्ञ     १७एक्सरे तंत्रज्ञ     १२फार्मासिस्ट    १६वार्डबॉय     १८७समुपदेशक     २हॉस्पिटल मॅनेजर    २एकूण    ३९१

टॅग्स :kalyanकल्याणhospitalहॉस्पिटल