शहरं
Join us  
Trending Stories
1
टीडीपीने अद्याप पत्तेच खोललेले नाहीत, भाजप टेन्शनमध्ये; लोकसभा अध्यक्षपदासाठी बैठकांचे सत्र
2
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
3
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
4
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
5
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
6
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
7
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
10
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
11
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
12
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
13
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
14
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
15
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
16
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
17
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा
18
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
19
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
20
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत

CoronaVirus News: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत दररोज पाच हजार चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 12:54 AM

लढा कोरोनाशी : आतापर्यंत चार लाख ९१, ९३७ जणांची चाचणी

कल्याण : केडीएमसी हद्दीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने चाचण्यांचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. सध्या दिवसाला पाच हजार जणांची चाचणी केली जात आहे, अशी माहिती मनपाच्या आरोग्य विभागाने दिली. मनपाची रुग्णालये, चाचणी केंद्रे, तसेच खासगी पॅथॉलॉजी लॅबमध्ये अँटिजन व आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. कोरोना रोखण्यासाठी मनपाने चाचण्यांवर भर दिला आहे. मनपाने याव्यतिरिक्त बस डेपो आणि कल्याण रेल्वेस्थानकातही चाचणी केंद्र सुरू ठेवले आहे. कोरोनाचे निदान लवकर झाल्यास रुग्णावर तातडीने उपचार सुरू करणे शक्य होते. त्यामुळेच चाचण्या वाढविण्यात येत असल्याचे मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले. मनपा हद्दीत दररोज पाच हजार जणांची चाचणी केली जात आहे. कोरोना चाचणीनंतर पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २३ टक्के आहे. हे प्रमाण १० टक्क्यांच्या आत असायला हवे. कोरोना रुग्णांचा दुपटीचा दर हा ४३ दिवसांवर आला आहे.  डॉ. रजनीकांत देसाई म्हणाले, आता आरटीपीसीआर चाचणीसाठी ५०० रुपये आकारले जातात. घरी जाऊन चाचणी केल्यास ७०० रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे हे दर परवडणारे आहेत.‘लस तातडीने उपलब्ध करून द्या’राज्य सरकारच्या नव्या निर्बंधांनुसार रिक्षा, टॅक्सी आणि बसचालकांनी १० एप्रिलपूर्वी आरटीपीसीआर चाचणी करून घ्यायची आहे. १५ दिवसांची वैधता ठरविली आहे, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकानांतील कामगारांनाही आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. ही चाचणी करून घेण्याची जबाबदारी दुकानमालकाची आहे; अन्यथा त्यांचे दुकान बंद करण्याची कारवाई केली जाईल.मात्र, आरटीपीसीआर चाचणीचा ५०० रुपयांचा खर्च परवडणार नसल्याने या सगळ्य़ांना कोरोनाची लस तातडीने उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी दुकानदार व रिक्षाचालक-मालक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या