शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

Coronavirus : लॉकडाऊनला कामा संघटनेचा विरोध, कारखानदार आणखी गाळात जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 03:10 IST

Coronavirus in Maharashtra : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी मार्चअखेरीस देशभरात लॉकडाऊन झाले. तेव्हापासून बंद पडलेल्या कंपन्या कशाबशा नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्या. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, अशी चिंता उद्योजकांना सतावत आहे.

- अनिकेत घमंडी  डोंबिवली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षी मार्चअखेरीस देशभरात लॉकडाऊन झाले. तेव्हापासून बंद पडलेल्या कंपन्या कशाबशा नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्या. आता पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, अशी चिंता उद्योजकांना सतावत आहे. अगोदरच लॉकडाऊनमुळे कारखानदार, उद्योजक, व्यापाऱ्यांसह सर्वच घटकांचे झालेले आर्थिक नुकसान विचारात घेता पुन्हा लॉकडाऊन नको, अशी ठाम भूमिका कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे (कामा) अध्यक्ष देवेन सोनी यांनी घेतली आहे.  कल्याण-डोंबिवली महापालिकेने आधीच उद्योजकांना मालमत्ता जप्तीसंदर्भात नोटीस पाठविली आहे. त्यामुळे कराची रक्कम भरण्यासाठी त्यांना पैशाची जमवाजमव करावी लागत आहे. व्यवसाय तोट्यात आला आहे. कामधंदा काही नाही, पण खर्च अमाप असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काय करावे सुचत नाही. त्यातच पुन्हा लॉकडाऊन केले, तर आम्ही आधीच कर्जबाजारी आहोत, त्यात आणखी समस्येत जाऊ, असे ते म्हणाले. त्यामुळे लॉकडाऊन होऊ नये, अशा भूमिकेत कामा संघटना आहे. त्यानंतरही लॉकडाऊन केल्यास त्याला तीव्र विरोध होईल, असे ते म्हणाले. अजूनही कंपन्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत, कामगार पूर्णपणे आलेले नाहीत. लॉकडाऊननंतर कच्चा माल महागला आहे. त्यामुळे वाढीव दराने हा माल उद्योजकांना विकत घ्यावा लागत आहे. मजूर महागला आहे. असे असतानाही बाजारात तयार मालाला मागणी नाही. अनेक कंपन्यांची माल उत्पादित करण्याची क्षमता असली तरी मागणी नसल्याने पुरवठा नाही. असे असताना कामगारांना बसून पगार द्यावा लागत आहे, अशा अनेक संकटांना उद्योजकांना सध्या सामोरे जावे लागत आहे. मात्र, त्यावर महापालिका, एमआयडीसी, उद्योग मंत्रालय बोलायला तयार नाही. आम्हाला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत; पण वर्षभरात दिलासा देणारे एकही पाऊल पुढे पडलेले नाही, अशी खंत सोनी यांनी व्यक्त केली.  पुन्हा टॉपअप कर्ज कोण देणार?केंद्र सरकारने उद्योजकांना टॉपअप कर्ज दिले; परंतु ज्यांच्या कंपन्याचे खाते राष्ट्रीयीकृत बँकेत आहेत, त्यांना त्याचा खरा लाभ मिळाला. खासगी बँकेतील खातेधारकाला काहीच मिळाले नाही. आता पुन्हा कोण टॉपअप कर्ज देईल, असा सवाल सोनी यांनी केला. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता लॉकडाऊन परवडणारे नाही, असे सोनी ठामपणे म्हणाले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkalyanकल्याणdombivaliडोंबिवली