शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus live news: बार, रेस्टाॅरंट कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचे आदेश; KDMC आयुक्तांनी दिल्या सूचना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 00:25 IST

कल्याण डोंबिवलीत बुधवारी तब्बल ८८१ काेरोना रुग्ण आढळले. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने बार, रेस्टाॅरंट आणि हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी येत्या सात दिवसांत करून त्याचा अहवाल मनपाने दिलेल्या मेल आयडीवर पाठवावा, असे आदेश मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हॉटेल मालक-चालकांना दिले आहेत. 

मनपा हद्दीत कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने ११ मार्चपासून काही निर्बंध घालण्यात आले आहे. त्यानंतर मिशन ‘बिगेन अगेन्स’चे आदेशही आयुक्तांनी काढले होते. त्यात कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आदेश दिले होते. बार, रेस्टाॅरंट आणि हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास मुभा आहे. तेथे मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असल्याने त्यांचा संपर्क कर्मचाऱ्यांशी येतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या कर्मचाऱ्यांची तातडीने कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल moh.kdmc@gmail.com या मेल आयडीवर आस्थापना चालक-मालकांनी पाठवावा, असे आयुक्तांनी म्हटले आहे. 

मनपाच्या सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेस्टाॅरंट, बार आणि हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची कोरोना आरटीपीसीआर चाचणी केली आहे की नाही, याची खातरजमा करावी. ज्या मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांची चाचणी केली नसेल, तर त्याच्याविरोधात साथरोग प्रतिबंधक कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई करावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

कल्याण-डोंबिवलीत ८८१ नव्या रुग्णांची भरकल्याण डोंबिवलीत बुधवारी तब्बल ८८१ काेरोना रुग्ण आढळले. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून २४ तासांत ४९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सद्य:स्थितीला ५,९२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण रुग्णांचा आकडा ७२,८८१ पर्यंत पोहोचला आहे. यातील ६५,६९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. १,२३३ रुग्णांचा  मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिमेत २७१, डोंबिवली पूर्वेत २६३ तर कल्याण पूर्वेत १४९ रुग्ण सापडले आहेत. डोंबिवली पश्चिमेतही १४४ रुग्ण आढळले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या