शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीच्या लसीकरण केंद्रावर गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 00:14 IST

पहाटे ४ वाजल्यापासून लावली रांग : रजिस्ट्रेशन न करणारे पोहाेचले लस घेण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कल्याण-डोंबिवली मनपाने शनिवारी पश्चिमेतील आर्ट गॅलरी येथे लसीकरण केंद्र सुरू ठेवले होते. तेथे १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांना  लस दिली जाईल. त्यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांना लस दिली जाईल, असे आवाहन मनपाने केले होते, तरीही या केंद्रावर गोंधळ उडाला.लस घेण्यासाठी २०० जणांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते. त्यापैकी आठ जण केंद्रावर पोहाेचले होते. ज्या नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते तेही लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर पोहाेचले. त्यांनी पहाटे ४ पासून लसीकरण केंद्राबाहेर रांग लावली होती. सकाळी ८ वाजता भलीमोठी रांग पाहून व्यवस्थापनाने त्यांना टोकन दिले होते. त्यांनी टोकन घेऊन रांगेत उभे राहणे पसंत केले. मात्र, दुपारी १ च्या सुमारास प्रशासनाने सांगितले की, ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणाऱ्यांनाच लस दिली जाईल. तेव्हा टोकन घेऊन रांगेत उभ्या असलेल्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लस द्यायचीच नव्हती, तर टोकन देऊन रांगेत कशाला उभे केले, असा संतप्त सवाल मयूर महाजन याने केला. ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणारे रजिस्ट्रेशन करून लस घेण्यासाठी येणार नसतील, तर ज्यांना टोकन देऊन रांगेत उभे केले आहे, त्यांना लस द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. 

एजन्सीची चूक : उपायुक्तमहापालिकेच्या उपायुक्त पल्लवी भागवत आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप निंबाळकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी सांगितले की, २०० जणांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले होते. २०० डोस केंद्रासाठी उपलब्ध झाले होते. गर्दी झाल्याने रांगेत उभे असलेल्यांना टोकन दिले गेले, तर उपायुक्त भागवत यांनी लसीकरणाचे काम करणाऱ्या एजन्सीची चूक असल्याचे नमूद केले.

 

 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाCorona vaccineकोरोनाची लस