मैत्रिणीला मदत करणे पडले महागात; डोंबिवलीच्या तरुणीच्या खात्यावर २.६० कोटींचा झाला व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:16 IST2026-02-27T14:13:08+5:302026-02-27T14:16:49+5:30

डोंबिवलीतील रिक्षा चालकाच्या मुलीच्या बँक खात्यात २ कोटी ६० लाख जमा झाल्याने खळबळ उडाली.

College Student Documents Misused for Multi Crore Scams in Dombivli | मैत्रिणीला मदत करणे पडले महागात; डोंबिवलीच्या तरुणीच्या खात्यावर २.६० कोटींचा झाला व्यवहार

मैत्रिणीला मदत करणे पडले महागात; डोंबिवलीच्या तरुणीच्या खात्यावर २.६० कोटींचा झाला व्यवहार

Dombivli Bank Fraud: सायबर फसवणुकीसाठी आपल्या नावाने तीन ते चार बैंक खाती बनविली गेली असून, त्याचा वापर उत्तराखंड आणि अन्य ठिकाणी पैशांच्या देवाणघेवाणीसाठी केल्याचा आरोप डोंबिवलीमधील महाविद्यालयीन तरुणी निधी तिवारी हिने केला. पोलिस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने तिने मनसे नेते अविनाश जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या पुढाकाराने रामनगर पोलिसांनी तिचा तक्रार अर्ज दाखल करून घेत तपास सुरू केला आहे.

मदत करणे अंगलट; कागदपत्रांचा गैरवापर 

बँकेत कामाला आणि ओळख असलेल्या एका तरुणीने लक्ष्य पूर्ण करण्यासाठी निधीला बँक खाते उघडण्यासाठी आग्रह केला होता. तिला मदत म्हणून निधीने तिची कागदपत्रे त्या तरुणीकडे सुपूर्द केली होती. हे खाते उघडण्यासाठी त्या तरुणीनेच तिचे पैसे भरले. परंतु, काही दिवसांनी एक धक्कादायक बाब अशी घडली की, जे खाते निधीने उघडले होते, त्यामध्ये तब्बल २ कोटी ६० लाखांचा व्यवहार झाल्याचे समोर आले. निधीच्या कागदपत्रांवरून आणखी तीन ते चार खाती उघडली गेल्याचेही तिला त्या खात्यामधील लाखो रुपयांच्या झालेल्या व्यवहारातून उघड झाले.

चौकशीनंतर कारवाई करण्यात येईल 

चौकशीअंती पुढील कारवाई होईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांनी दिली. सायबर फसवणुकीबद्दल मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या. पण, डोंबिवलीमधील एका तरुणीसोबत अशा प्रकारची फसवणूक होते आणि पोलिस गंभीर दखल घेत नाहीत, याचा अर्थ काय, असा संतप्त सवाल जाधव यांनी उपस्थित केला आहे.

Web Title : दोस्त की मदद करना पड़ा महंगा; डोंबिवली की युवती से ₹2.6 करोड़ की धोखाधड़ी

Web Summary : डोंबिवली की निधि तिवारी ने एक दोस्त को बैंक खाता खोलने में मदद की, लेकिन बाद में ₹2.6 करोड़ के लेनदेन और उसके नाम पर कई खाते खुले पाए गए। पुलिस पहले हिचकिचाई; राजनीतिक हस्तक्षेप के बाद जांच जारी है। साइबर धोखाधड़ी उजागर; कार्रवाई की मांग।

Web Title : Helping friend backfires; Dombivli woman defrauded of ₹2.6 crore

Web Summary : Dombivli woman, Nidhi Tiwari, helped a friend open a bank account, only to discover ₹2.6 crore in transactions and multiple accounts opened in her name. Police initially hesitated; investigation underway after political intervention. Cyber fraud exposed; action demanded.