धक्कादायक! लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, हत्या झाल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 12:20 IST2023-12-11T12:20:23+5:302023-12-11T12:20:59+5:30

रेल्वे स्थानक परिसरातील एका लॉजमधील रुममध्ये एका महिलेचा रविवारी मृतदेह आढळून आला. ज्योती तोरडमल असे मृत महिलेचे नाव आहे.

Body of woman found in lodge, suspected to be murdered | धक्कादायक! लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, हत्या झाल्याचा संशय

धक्कादायक! लॉजमध्ये आढळला महिलेचा मृतदेह, हत्या झाल्याचा संशय

कल्याण : रेल्वे स्थानक परिसरातील एका लॉजमधील रुममध्ये एका महिलेचा रविवारी मृतदेह आढळून आला. ज्योती तोरडमल असे मृत महिलेचे नाव आहे. एका व्यक्तीसोबत शनिवारी दुपारच्या सुमारास ती या लॉजमध्ये आली होती. या घटनेनंतर तिच्यासोबत आलेला भूपेंद्र गिरी पसार झाला आहे. ज्योतीची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्योतीचा मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

शनिवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास तृप्ती लॉजमध्ये भूपेंद्र याच्यासोबत ज्योती आली होती. रविवारी सकाळी रुमचा दरवाजा लॉजमधील कर्मचाऱ्यांनी उघडला तेव्हा ज्योतीचा मृतदेह आढळला.

मध्यरात्री ज्योतीच्या बहिणीला केला होता कॉल

एक वर्षापूर्वी लग्न झालेली ज्योती कोळसेवाडी येथील शंभर फुटी रस्ता येथे राहत होती. शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ज्योतीच्या मोबाइलवरून कॉल आला होता. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने ज्योतीची हत्या करत तिचा मृतदेह कल्याण रेल्वे रुळावर फेकून दिल्याचे सांगितले. या घटनेनंतर, रविवारी सकाळी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आम्ही जाऊन पोलिसांना माहिती दिली. आणि त्यानंतर घरी आल्यावर ज्योतीची हत्या झाल्याचे माहीत झाल्याचे ज्योतीची मोठी बहीण अर्चना अर्जुन भिसे यांनी सांगितले.

Web Title: Body of woman found in lodge, suspected to be murdered