शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

'युती वेगळ्या विचारांनी अन् उद्देशाने झालीय,आम्ही सगळे एकत्र'; श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 14:04 IST

युती धर्माचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांना समज दिल्याचं सांगण्यात येत आहे.

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत काम न करण्याचा ठराव भाजपाने कल्याण जिल्ह्याच्या लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत केला. यानंतर शिवसेना विरुद्ध भाजपा असा वाद पेटला होता. मात्र या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तोडगा निघाल्याची माहिती समोर आली होती. 

युती धर्माचे पालन करण्याचे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोन्ही नेत्यांना समज दिल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर आज श्रीकांत शिंदे यांनी देखील युती किरकोळ कारणाने तुटणार नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. कल्याण पूर्व येथील लोकग्राम पुलाचा भूमिपूजन सोहळा शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. मात्र, या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि भाजपाचे नेते रविंद्र चव्हाण हे अनुपस्थित होते. 

रविंद्र चव्हाण यांच्या अनुपस्थितीमुळे शिवसेना आणि भाजपामध्ये निर्माण झालेली दरी कमी होण्याचं नाव घेत नाही, अशी चर्चा कार्यक्रमादरम्यान सुरू झाली होती. मात्र  शिवसेना-भाजपा युतीत सगळे आलबेल आहे. आम्ही सगळे एकत्र आहोत. रविंद्र चव्हाण यांचे वेगळे कार्यक्रम आहेत. इथे सगळ चांगल चाललं आहे. युती वेगळ्या विचारांनी-उद्देशाने झालेली आहे. ती छोट्या किरकोळ कारणामुळे तुटणार नाही, असं स्पष्टीकरण खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. 

दरम्यान, पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांना आता एक वर्षाहून कमी काळ राहिला आहे. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना निवडणुकीचे तर नेतेमंडळी-आमदार-खासदारांना उमेदवारीचे वेध लागले आहेत. राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या आघाड्यांमध्ये आपापसांत जागावाटप नेमकं कसं होणार? यासंदर्भात बैठका सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे वेगवेगळ्या जागांसाठी काही ठिकाणी मित्रपक्षांमधलेच अनेक उमेदवार इच्छुक असल्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाkalyanकल्याणPoliticsराजकारण