पतीने केली पत्नीची हत्या, पत्नीच्या प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय 

By मुरलीधर भवार | Updated: September 26, 2022 19:11 IST2022-09-26T19:11:29+5:302022-09-26T19:11:56+5:30

कल्याण पूर्व येथे पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. 

A shocking incident of a husband killing his wife took place in Kalyan East  | पतीने केली पत्नीची हत्या, पत्नीच्या प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय 

पतीने केली पत्नीची हत्या, पत्नीच्या प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचा संशय 

कल्याण : पत्नीवर असलेल्या संशयातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याण पूर्व परिसरात घडली आहे .पती पत्नीचे भांडण सुरू असताना मध्यस्थी करण्यास गेलेल्या शेजाऱ्यावर देखील चाकूने हल्ला करण्यात आला असून तो देखील जखमी झाला आहे .या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात आरोपी सुनील शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून त्याला ताब्यात घेतलं आहे. तर जखमी झालेले परब यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याच्या संशयातून सुनील शिंदे याने ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला असून ते पुढील तपास करत आहेत .

कल्याण पूर्वेकडील तिसगाव पाडा परिसरात सुनील शिंदे आपल्या पत्नीसह राहतात. सुनीलला त्याच्या पत्नीवर असलेल्या संशयातून सुनील आणि त्याच्या पत्नीमध्ये सारखे वाद होत होते. आज सकाळच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. संतापाच्याभरात पती सुनीलने चाकूने पत्नीवर हल्ला केला. याच दरम्यान त्यांच्या शेजारी राहणाऱ्या परब नावाच्या तरुणाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनीलने रागामध्ये परबवर चाकूने हल्ला केला. जखमी झालेल्या परबने याबाबत कोळशेवाडी पोलिसांना माहिती दिली. कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुनील याला ताब्यात घेतलं. या हल्ल्यात सुनील यांची पत्नी मृत पावली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 

 

Web Title: A shocking incident of a husband killing his wife took place in Kalyan East