Video : या तरुणानं रिहाना अन् मिया खलीफाला असं धुतलं...!; व्हिडिओ पाहून लोक करतायत जबरदस्त तारीफ

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: February 7, 2021 14:25 IST2021-02-07T14:22:35+5:302021-02-07T14:25:27+5:30

या प्रकरणावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यानं सोशल मिडियावर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण मिया खलीफा आणि रिहानाला जबरदस्त धूताना दिसत आहे. या तरुणाला पाहून लोक त्याचे फेन झाले आहेत. (Youth stand with bollywood stars)

youth stand with bollywood stars and attack rihanna and mia khalifa video goes viral | Video : या तरुणानं रिहाना अन् मिया खलीफाला असं धुतलं...!; व्हिडिओ पाहून लोक करतायत जबरदस्त तारीफ

Video : या तरुणानं रिहाना अन् मिया खलीफाला असं धुतलं...!; व्हिडिओ पाहून लोक करतायत जबरदस्त तारीफ

नवी दिल्ली - सध्या देशात शेतकरी आंदोलन चर्चेचा विषय बनले आहे. यावरून सोशल मिडियावरही राजकारण तापलेले दिसत आहे. अनेक लोक या आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरले आहेत. नुकतेच प्रसिद्ध पॉप स्टार रिहाना (Rihanna) आणि मिया खलीफाने (आधीची पोर्न स्टार) (Mia Khalifa) या आंदोलनाचे समर्थन करत भडकाऊ ट्विट केले होते. एवढेच नाही, तर त्यांनी काही सिने कलाकारांवरही प्रश्न उपस्थित केला होता. याची सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा झाली. (Youth stand with bollywood stars and attack rihanna and mia khalifa video goes viral)

यातच आता, या प्रकरणावर एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यानं सोशल मिडियावर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये एक तरुण मिया खलीफा आणि रिहानाला जबरदस्त धूताना दिसत आहे. या तरुणाला पाहून लोक त्याचे फेन झाले आहेत. 

या दोघींनी काही बॉलीवुड स्टार्सवरही निशाणा साधला होता. यात अक्षय कुमार, अजय देवगन, सुनील शेट्टी यांच्या नावाचा समावेश होता. आता  या प्रकरणात एका युवकाची एन्ट्री झाली आहे. हा तरुण सोशल मिडियावर सध्या चर्चेचा विषय झाला आहे. या तरुणाने खास अंदाजात मिया खलीफा आणि रिहानाला फटकारले आहे. एवढेच नाही, तर या तीनही स्टार्सवर कुणीही प्रश्न उपस्थित करू नये, असा इशाराही या तरुणाने दिला आहे.

सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर बघितला जात आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 57 हजारहून अधिक लोकांनी बघितला आहे. तसेच या व्हिडिओवर जबरदस्त कमेंटदेखील येत आहेत. एका युझरने लिहिले आहे, 'भाई जुबान केसरी खा के बोल', ‘भावा, तू तर ट्विटरलाच हालवून टाकलं.’ आणखी एकाने लिहिले आहे, ‘नेक्स्ट लेवल भाई’. तर पाहूयात, लोकांनी या व्हिडिओवर काय-काय जिल्यायत कमेंट.

Web Title: youth stand with bollywood stars and attack rihanna and mia khalifa video goes viral