साडी नेसून तरुणीचा चित्तथरारक स्टंट,मारली हवेत उलटी उडी, व्हिडिओ पाहुन व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 19:58 IST2021-08-16T19:32:21+5:302021-08-16T19:58:20+5:30
एका तरुणीचा बॅकफ्लिप करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. विशेष बाब म्हणजे ही मुलगी अॅथलेटिक कपड्यांमध्ये नाही तर साडी नेसून हा जबरदस्त स्टंट करत आहे.

साडी नेसून तरुणीचा चित्तथरारक स्टंट,मारली हवेत उलटी उडी, व्हिडिओ पाहुन व्हाल हैराण
भारतात टॅलेंटची अजिबातही कमी नाहीये. सध्या याचाच प्रयत्य देणारा एका तरुणीचा बॅकफ्लिप करतानाचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. विशेष बाब म्हणजे ही मुलगी अॅथलेटिक कपड्यांमध्ये नाही तर साडी नेसून हा जबरदस्त स्टंट करत आहे (Woman Performs Backflip In Saree) . हा स्टंट तितका सोपा नाही, जितका या व्हिडिओमध्ये (Stunt Video) पाहताना वाटत आहे. मोकळ्या केसांमधील या तरुणीला साडीमध्ये पायऱ्यांच्याजवळ बॅकफ्लिप करताना पाहून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
व्हिडिओमध्ये मिशा नावाची ही तरुणी लाल साडीमध्ये जबरदस्त स्टंट करताना दिसत आहे. तिला पाहून आसपास उभा असलेले लोकही हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी तरुणी एक ट्रेंड जिमनास्ट आहे आणि तिचं नाव मिशा शर्मा आहे. मिशा इन्स्टाग्रामवर मिशा_ऑफिशियल नावानं प्रसिद्ध आहे. मीशानं हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शनही (Video Caption) दिलं आहे. 30 मिलियन व्ह्यूजसाठी आभारी आहे, असं तिनं आपल्या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
बॅकफ्लिकदरम्यान शरीर हवेत पूर्ण ३६०-डिग्रीमध्ये फिरतं, हे करण्यासाठी बरीच मेहनत, वेळ, अभ्यास आणि प्रयत्न करावा लागतो. याशिवाय या स्टंटसाठी साडी हे अजिबातही योग्य आउटफिट नाही. मात्र, यात देखील मिशा अगदी सहजपणे स्टंट करताना दिसते. तिनं आपल्या इन्स्टाग्राम पेजवर इतरही अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील काही व्हिडिओ खरोखरच हैराण करणारे आहेत. यातील काही व्हिडिओमध्ये ती असेच बॅकफ्लिप करताना दिसत आहे.