ज्या शिक्षकाला डेट करत होती तरूणी, त्याची 'मृत' पत्नी सोशल मीडियावर झाली प्रकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 17:19 IST2021-06-10T17:04:55+5:302021-06-10T17:19:28+5:30

ज्या व्यक्तीला ती बऱ्याच वेळेपासून डेट करत आहे त्याची पत्नी वारली आहे. मात्र, एक दिवस त्याच्या पत्नीबाबत हैराण करणारं सत्य समोर आलं.

Young girl dating a man whose wife was alive love fraud by dating app | ज्या शिक्षकाला डेट करत होती तरूणी, त्याची 'मृत' पत्नी सोशल मीडियावर झाली प्रकट

ज्या शिक्षकाला डेट करत होती तरूणी, त्याची 'मृत' पत्नी सोशल मीडियावर झाली प्रकट

(प्रातिनिधीक छायाचित्र)

प्रेम हे विश्वासावर टिकून असतं. खोटं बोलून ते जास्त दिवस टिकू शकत नाही. एका तरूणीने तिची अशीच प्रेम कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. 'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, तिने सांगितलं की तिला वाटत होतं की, ज्या व्यक्तीला ती बऱ्याच वेळेपासून डेट करत आहे त्याची पत्नी वारली आहे. मात्र, एक दिवस त्याच्या पत्नीबाबत हैराण करणारं सत्य समोर आलं.

सिसी हांकशॉ नावाच्या या तरूणीने टिकटॉकवर तिची झालेल्या फसवणुकीबाबत सांगितलं. तिने सांगितलं की, ऑनलाइट डेटींग अॅप टिंडरच्या माध्यमातून तिची भेट एका २५ वर्षीय शिक्षकासोबत झाली. तो  दिसायला सुंदर होता. तसंच तो एक रनरही होता. त्याच्यासोबत संवाद सुरू झाला. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटू लागले.

सिसी हांकशॉने सांगितलं की, ज्याच्या प्रेमात पडून ती आयुष्याची स्वप्ने बघत होती, त्याच्या मागील जीवनाबाबत जेव्हा तिने विचारलं तर एक दु:खद कहाणी समोर आली. २५ वर्षीय शिक्षकाने तिला सांगितलं की, त्याला एक मुलगा आहे आणि त्याच्या पत्नीचा एका अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून तो एकटा आहे आणि टिंडरवर आहे.

शिक्षकाच्या या सांगण्यावर तिने सहजपणे विश्वास ठेवला. पण ती त्याच्य कहाणीवरून दु:खी होती. आणि तिला त्याच्याबाबत सगळं काही जाणून घ्यायचं होतं. शिक्षकाच्या पत्नीबाबत जाणून घेण्यासाठी तिने त्याच्या मृत पत्नीचं प्रोफाइल चेक केलं. तेव्हा तिच्या समोर हैराण करणारं सत्य आलं.

शिक्षकाने ज्या पत्नीला मृत सांगितलं होतं, इन्स्टाग्रामवर तिने नुकतेच शेअर केलेले फोटो दिसलेत. जे बघून ती हैराण झाली. तिला विश्वास बसला नाही की हे सत्य आहे. शिक्षकाची पत्नी जिवंत होती आणि ते दोघे अजनूही सोबत राहत होते.

जेव्हा सिसी हांकशॉने शिक्षकाला याबाबत विचारलं तर त्याने सांगितलं की, तो खोटं बोलला होता. त्याची पत्नी जिवंत आहे. ही कहाणी शेअर केल्यावर सिसी हांकशॉच्या पोस्टवर कमेंटचा पाऊस पडलाय. काही अशा तरूणींनी तिला आधार दिला ज्यांना अशाप्रकारचे अनुभव आले आहेत. लोक यावर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. 
 

Web Title: Young girl dating a man whose wife was alive love fraud by dating app