शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
3
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
4
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
5
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
6
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
7
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
8
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
9
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
10
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
11
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
12
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
13
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
14
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
15
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
16
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
17
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
18
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
19
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
20
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील

एका फ्लॅटच्या किमतीत मिळत आहे अख्ख बेट, बेटावरील सौंदर्य पाहून व्हाल चकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2021 12:52 PM

Scottish Island in just 51 Lakh rupee: अवघ्या 51 लाख रुपयांमध्ये तुम्हाला 22 एकरमध्ये पसरलेले बेट मिळत आहे.

लंडन: स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे. बरेच लोक त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी खूप खटाटोप करतात. अनेक वेळा बजेट कमी असताना आपलं आवडतं घर किंवा फ्लॅट खरेदी करण्यासाठी काही काळ थांबायला तयार असतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला कोणी सांगितलं की, 2 बेडरुम फ्लॅटच्या बजेटमध्ये तुम्हाला संपूर्ण बेट मिळू शकतं, तर कोणीही त्यावर विश्वास ठेवणार नाही, पण हे खरं आहे.

दोन बेडरुम फ्लॅटच्या किमतीत मिळत असलेले हे बेट स्कॉटलंडच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे. हे 22 एकरमध्ये पसरलेलं स्कॉटिश बेट 70,000 अमेरिकन डॉलर म्हणजेच सुमारे 51 लाख रुपयांना मिळत आहे. हे बेट अतिशय सुंदर असून, पर्यावरण किंवा निसर्ग प्रेमींना हे बेट आवडल्याशिवाय राहणार नाही. पूर्णपणे निर्जण बेट अचिल्टीबुईपासून फक्त 1.5 मैल अंतरावर आहे.

ब्रिटनच्या आघाडीच्या बातम्यांच्या वेबसाईटपैकी एक असलेल्या 'द डेली रेकॉर्ड'मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, 'कार्न डीस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या समुद्री बेटाची विक्री होणार आहे. या नयनरम्य अशा दिसणाऱ्या बेटावर पोर्पोइज, डॉल्फिन, शार्क आणि व्हेल यासारखे वन्यजीव आढळून येतात. गोल्डक्रेस्ट लँड अँड फॉरेस्ट्री ग्रुपने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, बेटाच्या खरेदीदाराला तेथे बोटिंग, स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसारखे उपक्रम करण्याची परवानगी असेल.

गोल्डक्रेस्टच्या प्रवक्त्याने इनसाइडरला या कराराबद्दल सांगितले की, बेटावर कुठेही कोणतेही बांधकाम झालेले नाही. बेटावर लाकडी केबिनसुद्धा नाही. काही काळापूर्वीपर्यंत लोक येथे उन्हाळ्याच्या काळात मेंढ्या चरायला येत असत.गोल्डक्रेस्टच्या वेबसाईटनुसार, या बेटावर ओल्ड डॉर्नी हार्बर किंवा बडेनतरबॅट पियरवरुन फक्त 25 मिनिटांच्या बोट प्रवासाद्वारे पोहचा येते.स्वप्नांचे घर, स्वप्नांचा महाल, परींचे घर आणि राजपुत्रांचा बंगला अशी अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील. त्यामुळे हे बेट खरेदी करणाऱ्या व्यक्तीला या बेटावर त्याच्या आवडीची वास्तु बनवता येईल. 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय