'हा' आहे जगभरातील सर्वात महागडा केक; खावा की जपून ठेवाव हेच कळणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 12:40 IST2019-11-07T12:40:12+5:302019-11-07T12:40:47+5:30
फोटो पाहिलात का? फोटो पाहून तुम्हाला एखादा पुतळा किंवा सुंदर स्टॅच्यू वाटला असेल ना?

'हा' आहे जगभरातील सर्वात महागडा केक; खावा की जपून ठेवाव हेच कळणार नाही
फोटो पाहिलात का? फोटो पाहून तुम्हाला एखादा पुतळा किंवा सुंदर स्टॅच्यू वाटला असेल ना? पण तुमचा गैरसमज आहे. हा फोटो एका केकचा आहे. एवडचं नाहीतर जगातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हा केक जगभरातील सर्वात महागडा केक आहे.
किंमत ऐकून व्हाल अवाक्
केकची किंमत 1 कोटी रूपयांपेक्षा जास्त आहे. एवढचं नाहीतर हा केक तयार करण्यासाठी 10 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला आहे.
ब्रिटनमधील सेलिब्रिटी केक डिझायनरने केला तयार
जगातील सर्वात महागडा केक ब्रिटनमधील सेलिब्रिटी केक डिझायनरने तयार केला आहे. तिचं नाव डॅबी विंघेम्स असं आहे. दरम्यान डॅबीच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डही आहे. कारण एवढा महागडा केक आतापर्यंत कोणीच तयार केलेला नाही.
एक हजार खऱ्या मोत्यांचा समावेश
जगातील सर्वात महागड्या केक तयार करण्यासाठी जवळपास एक हजार खऱ्या मोत्यांचा वापर करण्यात आला आहे. एवढचं नाहीतर 5000 फूलं, 1000 अंडी, 25 किलो चॉकलेट्सचा वापर करण्यात आला आहे. याचं वजन जवळपास 100 किलो आहे.
डॅबीचा अंदाजचं वेगळा
डॅबीचा केक तयार करण्याचा अंदाज फारच वेगळा आहे. ती खुर्ची, सोफा यांसारख्या वेगवेगळ्या आकारात केक तयार करते. एवढचं नाहीतर ती बॉलिवूड स्टाइलचेही केक तयार करते.