शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

चीनमध्ये सापडला जगातील सर्वात मोठा डास, आकार पाहून तुम्हाला बसेल धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 9:01 AM

डासांचा त्रास झाला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.  तुम्ही घरात आणि घराबाहेर छोटे मोठे असंख्य डास पाहिले असतील, पण चीनमध्ये सापडलेल्या या डासाएवढा डास तुम्ही नक्कीच पाहिला नसेल.

बीजिंग - डासांचा त्रास झाला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही.  तुम्ही घरात आणि घराबाहेर छोटे मोठे असंख्य डास पाहिले असतील, पण चीनमध्ये सापडलेल्या या डासाएवढा डास तुम्ही नक्कीच पाहिला नसेल. चीनमधील सिचुआन प्रांतात कीटकतज्ज्ञांनी एका भल्यामोठ्या डासाचा शोध लावला आहे. या डासाच्या पंखांचा विस्तार सुमारे 11.15 सेंटीमीटर आहे. चीनमधील सरकारी प्रसारमाध्यम असलेल्या शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार हा डास गतवर्षी ऑगस्ट महिन्यात सापडला होता.   पश्चिम चीनमधील कीटक संग्रहालयाचे क्युरेटर चाओ ली यांनी सांगितले की, हा डास जगातील सर्वात मोठ्या डासांची प्रजात असलेल्या हालोरुसिया मिकादो वर्गातील आहे. डासांची ही जात सर्वप्रथम जपानमध्ये आढळली होती. संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार सर्वसामान्यपणे या प्रजातीमधील डासांच्या पंखांचा विस्तार हा 8 सेंटीमीटर पर्यंत असतो. पण हा नवा डास खूपच मोठा आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, हे डास आकाराने मोठे दिसत असले तरी ते माणसांचे रक्त शोषत नाहीत. या प्रजातीमधील प्रौढ डासांचे आयुर्मान काही दिवसांचेच असते. तसेच त्यांचा मुख्य आहार फुलांमधील परागकण असतो. जगभरात डासांच्या हजारो प्रजाती आहेत मात्र त्यापैकी केवळ 100 प्रजातीच मनुष्यासाठी त्रासदायक आहेत,अशी माहितीही चाओ ली यांनी दिली.   

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेchinaचीनwildlifeवन्यजीव