जगातलं सगळ्यात महागडं झाडं, किंमत इतकी की जगभराची करू शकाल सफर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 10:15 IST2023-07-03T10:12:30+5:302023-07-03T10:15:55+5:30
या झाडाचं नाव व्हाइट पाइन बोनसाय (Japanese white pine Bonsai tree) आहे. हे झाड जपानमध्ये आढळतं.

जगातलं सगळ्यात महागडं झाडं, किंमत इतकी की जगभराची करू शकाल सफर!
घरात लावल्या जाणाऱ्या सामान्य झाडाची किंमत फार कमी असते. सामान्यपणे 20 ते 100 रूपयात तुम्हाला झाड मिळतं. पण एका झाडाची किंमत इतकी आहे की, त्या पैशांतुम्ही जगभराची सफर करू शकता. हे झाड जगातलं सगळ्यात महागडं झाड आहे. चला जाणून का या झाडाची इतकी किंमत.
या झाडाचं नाव व्हाइट पाइन बोनसाय (Japanese white pine Bonsai tree) आहे. हे झाड जपानमध्ये आढळतं. 2011 च्या आंतरराष्ट्रीय बोनसाय संमेलनात व्हाइट पाइन बोनसाय झाडाला 1.3 मिलियन डॉलर किंमत मिळाली होती. भारतीय करन्सीनुसार ही किंमत 10 कोटी रूपयांपेक्षा जास्त होते.
प्रसिद्ध बोनसाय ट्री आर्टिस्ट सेइजी मोरीमे (Seiji Morimae) यांनी या झाडाला एक जपानी खाजगी संग्रहकाला विकलं होतं. हे झाड मियाजिमा देवदार प्रजातीचं झाड आहे. ज्याल मजबूत पाने, मूळ, फांद्या असतात. एका माहितीनुसार, या बोनसाय झाडाचं आयुष्य 800 वर्षापर्यंत असतं.
त्याशिवाय 800 वर्ष जुन्या ताकामात्सु पाइन बोनसाय झाडाची किंमत साधारण 10 कोटी रूपये आहे. हे झाडही जपानी व्हाइट पाइन बोनसाय झाडाच्या प्रजातीचच आहे. हे 2012 मध्ये साधारण 10 कोटी रूपयांना विकण्यात आलं होतं.
हे एक परफेक्ट आकाराचं जपानी व्हाइट पाइन बोनसाय होतं. ज्यात एका पौराणिक झाडाचे सगळे गुण होते. यात एक विशाल खोड, साल आणि एक पूर्ण छत्रीसारखं छप्पर आहे. तरीही या झाडाची लांबी 1 मीटरपेक्षा कमी होती.