शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जगातील सर्वात बोल्ड आज्जीने सांगितलं तिच्या सौंदर्याचं रहस्य, पिते 'हा' खास ज्यूस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 18:03 IST

तिने आता तिच्या सौंदर्यामागील एक रहस्य शेअर केलं आहे (Health Tips). हे रहस्य एक जादुई पेय असल्याचा तिचा दावा आहे. हे प्यायला सुरुवात केली की माणसाच्या आरोग्यात आणि शरीरात उत्तम बदल आपोआप दिसू लागतात, असं तिचं म्हणणं आहे.

जिच्या फिटनेसनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं. जिचं शरीर आणि चमकती त्वचा पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणंही शक्य होत नाही. अशी सुंदर आजी आता तिच्या सौंदर्याचं गुपित शेअर करत आहे (Boldest Granny). ऑस्ट्रेलियाची जिना स्टिवर्ट, हिला जगातील सर्वात फीट आणि धाडसी आजी म्हणून ओळखलं जातं. तिने आता तिच्या सौंदर्यामागील एक रहस्य शेअर केलं आहे (Health Tips). हे रहस्य एक जादुई पेय असल्याचा तिचा दावा आहे. हे प्यायला सुरुवात केली की माणसाच्या आरोग्यात आणि शरीरात उत्तम बदल आपोआप दिसू लागतात, असं तिचं म्हणणं आहे.

बोल्ड आणि सुंदर मॉडेल जिना स्लिम फिगरसाठी एक खास पेय सुचवते ज्यात औषधी वनस्पती आहेत. हे प्यायल्यानंतर थकवा जाणवत नाही आणि पोटाची चरबी लवकर नाहीशी होते. ज्यांचं पोट अजून बाहेर आलेलं नाही त्यांच्यासाठीही ही गोष्ट मेन्टेन ठेवण्याकरता हे पेय उपयुक्त ठरतं.

उत्कृष्ट शरीरयष्टी आणि बोल्ड स्टाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या जिना स्टिवर्टचे इंस्टाग्रामवर ३ लाख २१ हजार फॉलोअर्स आहेत. इथे ती बोल्ड स्टाईलसह फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाइलबद्दल टिप्स देत असते. हे तिच्या चाहत्यांना खूप आवडतं. जिना ही व्यावसायिक आरोग्य प्रशिक्षक नसली तरी, तिने राखलेली स्वतःची शरीरयष्टी पाहून कोणालाही तिच्या टिप्स त्वरीत फॉलो करायला आवडेल.

जिनाने सांगितलेल्या स्पेशल ड्रिंकची रेसिपी म्हणजे सहा कप पाण्यात अर्धे कापलेले लिंबू, अर्ध्या लिंबाचा रस, काही पुदिन्याची पाने, चिरलेली काकडी आणि एक चमचा ताज्या आल्याचा रस मिसळून बनवलेलं हर्बल ड्रिंक. हे शरीरातील सर्व विषारी द्रव्ये काढून टाकतं. शरीराला आतून शुद्ध करते. ज्यामुळे व्यक्तीला दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते.

फक्त इतकंच नाही तर तुम्हाला त्वचेवरही याची चमक पाहायला मिळेल., हेच जिनाच्या चमकदार त्वचेचे रहस्य आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तिचे अनेक चाहते आहेत. तिला आतापर्यंतच्या  १० सर्वात बोल्ड ऑस्ट्रेलियन्सपैकी एक म्हणूनही वोट दिलं गेलं होतं. तिच्या चाहत्यांना तिने दिलेल्या टिप्स आवडतात आणि ते या फॉलोही करतात.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सAustraliaआॅस्ट्रेलिया