बोंबला! प्रियकरासोबत करत होती कोर्ट मॅरेज, अचानक समोर आला पती आणि मग झालं असं काही....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2021 17:45 IST2021-09-13T17:41:12+5:302021-09-13T17:45:05+5:30
दोघांनी पळून जाऊन कोर्ट मॅरेज करण्याचा प्लॅन केला. महिला तरूणासोबत लग्न करण्यासाठी कुलपहाडच्या तहसीलमध्ये पोहोचली.

बोंबला! प्रियकरासोबत करत होती कोर्ट मॅरेज, अचानक समोर आला पती आणि मग झालं असं काही....
उत्तर प्रदेशच्या महोबा जिल्ह्यातील कुलपहाड तहसीलमध्ये सर्वांनाच धक्का बसला जेव्हा प्रियकरासोबत मिळून कोर्ट मॅरेजसाठी कायदेशीर कारवाई करत असलेल्या महिलेसमोर तिचा पती आला. पतीला समोर बघून पत्नीच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. पत्नीनेही एखाद्या तरबेज अभिनेत्री प्रमाणे अभिनय करत रंग बदलला आणि पतीच्या बाजूने झाली.
मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यातील २४ वर्षीय महिलेचं चार वर्षाआधी लग्न झालं होतं. महिलेने कोर्ट मॅरेजसाठी दिलेल्या अर्जावर पती सतत दारू पितो आणि नेहमीच मारहाण करण्याचा आरोप लावला होता. यादरम्यान महिलेचे संबंध महोबा जिल्ह्यातील एका तरूणासोबत जुळले. दोघांनी पळून जाऊन कोर्ट मॅरेज करण्याचा प्लॅन केला. महिला तरूणासोबत लग्न करण्यासाठी कुलपहाडच्या तहसीलमध्ये पोहोचली. (हे पण वाचा : अरे बाप रे बाप! २५ वेगवेगळ्या पुरूषांसोबत पळून गेली होती महिला, मग पती म्हणाला असं काही...)
पोलिसांना घेऊन आला होता पती
महिला आणि तिचा प्रेमी वकिलाकडे कोर्ट मॅरेजची कागदपत्र तयार करत होती. तेव्हाच तिचा पती पोलिसांना सोबत घेऊन तिथे पोहोचला. पतीला पत्नी कोर्ट मॅरेज करत असल्याची खबर आधीच मिळाली होती. अचानक समोर पती आणि पोलिसांना बघून महिलेने गोंधळ घालणं सुरू केला आणि म्हणू लागली की, तिला माहीत नाही काय झालं होतं. ती पतीच्या पायावर पडून माफी मागू लागली आणि म्हणाली की, ती दुसरं लग्न करणार नाही.
एसएसआय कुलपहाड देवेंद्र मिश्रा म्हणाले की, महिलेने आपली चूक मान्य केली आणि आपल्या पतीसोबत घरी परत गेली. या प्रकरणात कोणत्याही पक्षाकडून तक्रार न मिळाल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.