अरेरे! सुंदर दिसण्याची हौस पडली महागात; ओठांचा आकार 5 पटीने वाढला अन्..; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 16:04 IST2022-04-11T15:57:27+5:302022-04-11T16:04:17+5:30
छान दिसण्याच्या नादात तरुणीने इंजेक्शन घेतलं पण भलत्याच जागी विपरित परिणाम झाला आहे. जो पाहून तरुणीला मोठा धक्काच बसला.

अरेरे! सुंदर दिसण्याची हौस पडली महागात; ओठांचा आकार 5 पटीने वाढला अन्..; नेमकं काय घडलं?
आपण सुंदर दिसावं यासाठी काही जण वाटेल ते करतात. यासाठी मेकअपशिवाय कॉस्मेटिक सर्जरीचाही पर्याय उपलब्ध झाला आहे. सुंदर दिसण्याच्या नादात केलेला भलताच प्रयोग अनेकदा अंगाशी येतो. अशीच एक घटना आता समोर आली आहे. छान दिसण्याच्या नादात तरुणीने इंजेक्शन घेतलं पण भलत्याच जागी विपरित परिणाम झाला आहे. जो पाहून तरुणीला मोठा धक्काच बसला. महिलेने ओठांची ट्रिटमेंट केल्यानंतर त्याचा उलटाच परिणाम झाला आणि हे पाहून ती स्वत: देखील अतिशय घाबरली आहे.
टिकटॉकवर syddyliciousxoxo नावाने ओळख असलेल्या महिलेने केलेल्या लीप फीलरचा भयंकर परिणाम समोर आला आहे. या ट्रिटमेंटनंतर तिचे ओठ फुग्याप्रमाणे फुगले आहेत. आता तिला ओठांचीच लाज वाटू लागली आहे. द सनच्या रिपोर्टनुसार महिलेने लीप फीलर केलं. पण तिने हे लीप फीलर डिजॉल्व्ह करण्याचा प्लॅन केला. पण यानंतर जो रिझल्ट आला त्याने तिला मोठा धक्काच बसला.
डिजॉल्व्ह इंजेक्शनने संपूर्ण चेहरा बिघडवला. ओठ आधीपेक्षा अधिक मोठे दिसू लागले. तिच्या ओठांचा आकार इतका बदलला की तिला त्यावर विश्वासच बसत नव्हता की असं काही होऊ शकेल. तिचे ओठ खऱ्या आकारच्या ओठांहून पाच पट अधिक मोठे झाले. लीप फीलर जास्त झाल्याने आकार वाढल्याचं समजू शकतं. परंतु Lip filler Dissolve ट्रिटमेंटने असा झालेला परिणाम धक्कादायक असल्याचं म्हटलं जात आहे.
महिलेने ब्यूटी ट्रिटमेंटचा हा परिणाम सोशल मीडियावर शेअर केला. तिने आधी आणि नंतर असे फोटो युजर्ससह शेअर केले. हे फोटो पाहून अनेक जणांना धक्काच बसला आहे. Lip filler Dissolve मुळे झालेल्या एलर्जीने महिलेच्या चेहऱ्याचं संपूर्ण रुपच बदललं असून अशा ट्रिटमेंट किती धोकादायक असू शकतात याचा अंदाज येतो. काही दिवसांपूर्वी एका तरुणीला देखील कॉस्मेटिक सर्जरी अशीच महागात पडली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.