भयंकर! बागेत फिरत असताना ८२ वर्षीय महिलेच्या पोटात शिरला १८ सेमी लांब चाकू; अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 13:26 IST2021-02-16T13:03:30+5:302021-02-16T13:26:56+5:30

Viral News in Marathi : बागेत फिरत असताना पाय सटकून ही महिला पडली आणि तिच्या पोटात १८ सेंटीमीटर लांब चाकू शिरला. 

Woman slips while gardening knife got stuck in her abdomen news in | भयंकर! बागेत फिरत असताना ८२ वर्षीय महिलेच्या पोटात शिरला १८ सेमी लांब चाकू; अन् मग....

भयंकर! बागेत फिरत असताना ८२ वर्षीय महिलेच्या पोटात शिरला १८ सेमी लांब चाकू; अन् मग....

अनेकदा अशा घटना घडतात, ज्याबाबत ऐकूनच मन सुन्न होतं. अशीच  एक धक्कादायक घटना  समोर आली  आहे. एक ८२ वर्षीय महिला आपल्या बागेत फिरत होती.  त्याचवेळी ही घटना घडली आहे. बागेत फिरत असताना पाय सटकून ही महिला पडली आणि तिच्या पोटात १८ सेंटीमीटर लांब चाकू शिरला. 

काय आहे संपूर्ण प्रकरण

EJVES forum नं या घटनेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. ही घटना स्वित्जरलँडची असल्याचे सांगितले जात आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर या महिलेला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार चाकूमुळे या महिलेच्या पोटत गंभीर जखमा झाल्या होत्या. ज्यामुळे या महिलेच्या आतड्यांचा काही भाग वेगळा झाला होता.  या महिलेच्या पोटातून चाकू बाहेर काढल्यानंतर पोटाचे ऑपरेशन करण्यात आले.  खऱ्या प्रेमाच्या शोधात अनोखा प्रयोग, इतके महिने साखळीने बांधून एकत्र राहणार हे कपल....

आश्चर्यकारक बाब म्हणजे जेव्हा हा चाकू पोटात शिरला तेव्हा जरासंही रक्त बाहेर आलं नाही. या महिलेला आयसीयूमध्ये नेण्यात आलं.  तीन दिवसांनी या महिलेची कार्डीओवॅस्क्यूलर सर्जरी करण्यात आली.  लय भारी! सोशल डिस्टेंसिंगचे धडे देणारं प्री वेडिंग फोटोशुट; पाहा जोडप्याचे भन्नाट फोटो

Web Title: Woman slips while gardening knife got stuck in her abdomen news in