Resume मध्ये दिलेल्या खोट्या माहितीवरून तिला मिळाली १ कोटी पगाराची नोकरी आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2019 01:10 PM2019-12-06T13:10:55+5:302019-12-06T13:15:18+5:30

नोकरी मिळवण्यासाठी लोक काहीना काही खोटं सांगतातच. हे अनेक एचआरला सुद्धा माहीत असतं. कारण चांगली नोकरी मिळवणं आज सोपंही राहिलेलं नाही.

Woman sentenced jail for lies on resume jailed in Australia | Resume मध्ये दिलेल्या खोट्या माहितीवरून तिला मिळाली १ कोटी पगाराची नोकरी आणि मग....

Resume मध्ये दिलेल्या खोट्या माहितीवरून तिला मिळाली १ कोटी पगाराची नोकरी आणि मग....

Next

(Image Credit : businessinsider.in)

नोकरी मिळवण्यासाठी लोक काहीना काही खोटं सांगतातच. हे अनेक एचआरला सुद्धा माहीत असतं. कारण चांगली नोकरी मिळवणं आज सोपंही राहिलेलं नाही. पण एका महिलेला खोटं सांगण्याचा हद्द पार केली. या महिलेने तिच्या बायोडेटाममध्ये तिला १ कोटी रूपये पगार असल्याचं लिहिलं. त्यानुसार तिला नोकरीही मिळाली. पण नंतर तिला हे खोटं सांगणं महागात पडलं. 

(Image Credit : headtopics.com)

महिलेचं नाव वेरोनिका हिल्डा थेरियॉल्ट असं आहे. ही घटना आहे ऑस्ट्रेलियातील. या महिलेने तिच्या बायोडेटामध्ये अनेक गोष्टी खोट्या लिहिल्या होत्या. तिने यात ती एका कंपनीची माजी कर्मचारी असल्याचं सांगितलं. नंतर तिने खोटा पगार आणि खोटे अनुभवही त्यात दाखवले. इतकेच काय तर खोटे रेफरन्सही दिले गेले.

साउथ ऑस्ट्रेलिया गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट ऑफ प्रिमिअर अ‍ॅन्ड कॅबिनेटमध्ये तिला नोकरी तर मिळाली. पण नंतर तिचा भांडाफोड झाला. या महिलेचा येथील पगार २७०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर इतका होता. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम १,३२,०८,४३७ रूपये इतकी होते. इथे तिने साधारण १ महिना काम केलं. त्यातून तिला ३३ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच १६ लाख १६ हजार ७७६ रूपये मिळाले.

(Image Credit : ibtimes.sg)

पण तिचा भांडाफोड झाल्यावर खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या आणि खोटी माहिती दिल्याच्या गुन्ह्यात तिला अटक करण्यात आली. आता तिला २५ महिन्यांची शिक्षा झाली असून ज्यातील १२ महिन्यांच्या शिक्षेदरम्यान तिला पेरोल अजिबात दिला जाणार नाहीये.


Web Title: Woman sentenced jail for lies on resume jailed in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.