महिलेने सांगितलं जीवनाचं असं डार्क सीक्रेट, मैत्रिणीसोबत पती करते शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 09:37 IST2023-12-13T09:34:59+5:302023-12-13T09:37:50+5:30

ब्रिटनमध्ये राहणारी ट्रायथलीट कॅटीने तिच्या लाइफचे डार्क सीक्रेट सांगितले. ती म्हणाली की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा ती कंटेंट क्रिएटर रॉब ओज याला पहिल्यांदा भेटली.

Woman reveals dark secrets of life share husband with best friend and her husband weird relationship | महिलेने सांगितलं जीवनाचं असं डार्क सीक्रेट, मैत्रिणीसोबत पती करते शेअर

महिलेने सांगितलं जीवनाचं असं डार्क सीक्रेट, मैत्रिणीसोबत पती करते शेअर

असं म्हणतात की, मित्र प्रत्येक गोष्टी शेअर करतात. पण प्रत्येक गोष्टीची एक सीमाही असते. तुम्ही वस्तू किंवा खायच्या गोष्टी शेअर करू शकता. पण व्यक्ती? एका महिलेने हा कारनामा केला आहे. या महिलेचं मत आहे की, ती तिचा पती तिच्या मैत्रिणीसोबत आणि पतीसोबत शेअर करते. चौघेही सोबत राहतात. ब्रिटनमध्ये राहणारी ट्रायथलीट कॅटीने तिच्या लाइफचे डार्क सीक्रेट सांगितले. ती म्हणाली की, हे सगळं तेव्हा सुरू झालं जेव्हा ती कंटेंट क्रिएटर रॉब ओज याला पहिल्यांदा भेटली.

या दोघांची भेट ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. नंतर डेटिंगच्या एक आठवड्यानंतर त्यांनी एंगेजमेंट केली. त्यानंतर लग्नही केलं. पण आता त्यांनी जे केलं, त्याने कॅटीचा परिवार टेंशनमध्ये आला.

कॅटी सांगते की, आता ती आणि ओज तिची मैत्रीण आणि तिच्या पतीसोबत राहतात. दोन्ही कपल बेडरूमही शेअर करतात. त्यांचं मत आहे की, जेव्हा आम्ही विल आणि डी यांना भेटलो तेव्हा या अजब नात्याची सुरूवात झाली. आम्ही केवळ प्रेम करतो जज नाही. असं आम्ही पहिल्यांदा करत होतो.

कॅटी आणि ओज आता पॉलीमोरस रिलेशनशिपमध्ये आहेत, म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहणं. आता सगळे सोबत राहून कंटेंट क्रिएटरचं काम करतात. आता चौघेही एका कपलसारखे नात्यात आहेत. पण त्यांच्या या नात्यावर लोकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

त्यांना टिकेचा सामना करावा लागत आहे. कॅटी सांगते की, आता ते फोरसम रिलेशनशिपमध्ये आहेत. म्हणजे चार लोकांनी कपलसारखं सोबत राहणे. पण यामुळे अनेक लोक कन्फ्यूज होतात. लोक तोंडावर काही म्हणत नाहीत, पण सोशल मीडियावर ट्रोल करतात. असं असूनही आम्ही चौघेही आनंदी आहोत. 

Web Title: Woman reveals dark secrets of life share husband with best friend and her husband weird relationship