मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली महिला, आता तिला सतावयीये ही चिंता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 10:24 IST2023-04-07T10:24:34+5:302023-04-07T10:24:57+5:30

Woman Has Crush On Son’s Best Friend: असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ती तिच्या मुलाच्या वयाच्या एका तरूणाला पसंत करू लागली. आता ती या गोष्टीने चिंतेत आहे की, ही बाब तिच्या मुलाला समजू नये.

Woman has crush on teenage sons best friend now struggling to hide it | मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली महिला, आता तिला सतावयीये ही चिंता!

मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली महिला, आता तिला सतावयीये ही चिंता!

Woman Has Crush On Son’s Best Friend: नाती कधी, कशी आणि कुठे जुळतील काही सांगता येत नाही. खासकरून मानवीय नात्यांबाबत सांगायचं तर काही अशी उदाहरण सापडतात ज्यांचा कधी विचार केला गेला नसेल. म्हणजे तरूणी आपल्याहून तिप्पट वयाने मोठ्या पुरूषाच्या प्रेमात पडतात, तर काही वयस्कर महिला फार लहान वयाच्या तरूणाच्या प्रेमात पडतात. 

असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ती तिच्या मुलाच्या वयाच्या एका तरूणाला पसंत करू लागली. आता ती या गोष्टीने चिंतेत आहे की, ही बाब तिच्या मुलाला समजू नये. 39 वर्षीय महिलेला 23 वर्षीय महिलेसोबत जास्त काळ नातं टिकवायचं नाहीये. पण या रोमॅंटिक नात्याला लगेच संपवायचं देखील नाहीये.

मुलाच्या मित्रावर जडलं मन

रेडिटवर महिलेने स्वत: सांगितलं की, ती तिच्याच मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली आहे. तिने हेही सांगितलं की, ती आता या गोष्टीमुळे चिंतेत आहे की, ही गोष्ट ती आपल्या मुलाला कशी सांगणार. कारण त्याला याचं वाईट वाटेल. तरूण दिसायला सुंदर आहे आणि हुशारही आहे. जेव्हा तो 19 वर्षांचा होता तेव्हापासून महिला त्याला पसंत करते. आता त्याचं वय 23 वर्ष आहे. 

फक्त मजेसाठी नातं

महिलेने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, तिला या नात्याचं कोणतंही भविष्य ठेवायचं नाहीये. लोकांनी तिला सांगितलं सुद्धा की, तिने तिच्या वयाच्या एखाद्या व्यक्तीसोबत नातं ठेवायला पाहिजे. पण तिला तिच्या या नात्यातून फार काही अपेक्षा नाहीत. ती केवळ मजा-मस्ती म्हणून या नात्याकडे बघते. या पोस्टनंतर लोकांनी महिलेला हे नातं सोडण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून तिच्या मुलाला वाईट वाटणार नाही.

Web Title: Woman has crush on teenage sons best friend now struggling to hide it