बॉयफ्रेंड डेटवर आला नाही म्हणून कोर्टात खेचलं, मागितले ८ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 20:30 IST2022-07-22T20:28:11+5:302022-07-22T20:30:01+5:30
सामान्यपणे आपल्याला वेळ देऊन किंवा भेटायचं ठरवूनही जोडीदार भेटायला आला नाही की तरुणींना राग येतो. असं झालं की एकतर त्या पार्टनरशी काही दिवस बोलत नाही किंवा त्याला त्यांच्या सोईने काहीतरी शिक्षा दिसतात. पण अमेरिकेच्या मिशिगनमधील महिलेने मात्र यासाठी पार्टनरला कोर्टात नेलं.

बॉयफ्रेंड डेटवर आला नाही म्हणून कोर्टात खेचलं, मागितले ८ लाख रुपये
पार्टनर आपल्याला मारहाण करतो, छळतो, त्रास देतो अशा प्रकरणावरून महिला पोलीस ठाण्यात तक्रार देतात, कोर्टात आपल्याला न्याय देण्यासाठी दाद मागतात. पण एका महिलेने मात्र आपल्या पार्टनरला चक्क तो डेटवर आला नाही यासाठी कोर्टात खेचलं. त्याच्याकडे लाखो रुपयांच्या भरपाईची मागणी केली. प्रकरण पाहून जजही हैराण झाले. पण आश्चर्य म्हणजे या प्रकरणावर सुनावणीही झाली.
सामान्यपणे आपल्याला वेळ देऊन किंवा भेटायचं ठरवूनही जोडीदार भेटायला आला नाही की तरुणींना राग येतो. असं झालं की एकतर त्या पार्टनरशी काही दिवस बोलत नाही किंवा त्याला त्यांच्या सोईने काहीतरी शिक्षा दिसतात. पण अमेरिकेच्या मिशिगनमधील महिलेने मात्र यासाठी पार्टनरला कोर्टात नेलं.
शॉर्ट नावाच्या महिलेने आपला बॉयफ्रेंड रिचर्ड जॉर्डनविरोधात कोर्टात याचिका केली आहे. त्याच्याविरोधात 8 लाख रुपयांचा दावा ठोकला आहे. कारण काय तर तो डेटवर आला नाही. त्याने तिला वाट पाहायला लावली. महिलेने कोर्टात सांगितलं. बॉयफ्रेंडने डेटिंगचा प्लॅन केल्यानंतरही तो आला नाही. डेटवर तिला त्याची प्रतीक्षा करावी लागली. बराच वेळ वाट पाहूनही तो आला नाही, हा माझ्याझाठी भावनात्मक आघात आहे.
जॉर्डनने आपल्यावरील आरोपांना उत्तर देताना कोर्टात सांगितलं, मी शॉर्टसोबत फक्त एकदाच डेटवर गेलो होतो. त्यानंतर आमच्या दोघांमध्ये कोणतंच नातं नव्हतं. आता माझ्यावर 8 लाख रुपयांची केस चालू आहे. मला वाटतं हे वेळ वाया घालावणं आहे.
दोघांचीही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने हे प्रकरण निकाली काढण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा असं सांगितलं. त्यानंतर जजने हे प्रकरण सर्किट कोर्टात ट्रान्सफर केलं आहे. 2020 सालातील हे प्रकरण सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतं आहे.