अर्धा बेड भाड्याने देणे आहे... तरूणीने ठेवली भन्नाट ऑफर; नक्की काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 04:04 PM2023-11-20T16:04:43+5:302023-11-20T16:06:26+5:30

तरूणीने यासाठी एक महत्त्वाची अट ठेवली आहे...

woman charges rupees 75 thousand rent to share her bed in Toronto | अर्धा बेड भाड्याने देणे आहे... तरूणीने ठेवली भन्नाट ऑफर; नक्की काय आहे प्रकरण?

अर्धा बेड भाड्याने देणे आहे... तरूणीने ठेवली भन्नाट ऑफर; नक्की काय आहे प्रकरण?

Half bed on Rent: सहसा विवाहित जोडपी स्वत:साठी डबल बेड खरेbदी करतात, हे नेहमी दिसून येते. परंतु जे सिंगल आहेत त्यांच्यासाठी सिंगल बेड पुरेसा असतो. असे काही अविवाहित लोक असतात, जे किंग साइज बेड विकत घेतात आणि नंतर त्यावर आरामात पाय पसरून झोपतात. पण तुम्ही कधी हे ऐकले आहे का, की एखाद्या व्यक्तीने त्याच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने दिला आहे? होय, हे खूप विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. एका तरूणीकडे (Anya Ettinger) एक डबल बेड आहे, ज्यातील अर्ध्या बेडवर ती झोपते आणि उरलेला अर्धा बेड ती भाड्याने देते. तिच्या कमाईचा हा विचित्र मार्ग लोकांना आश्चर्याकारक वाटत असून याचं भाडं वाचल्याने तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

महत्त्वाची अट काय?

अन्या एटिंगर  असे या तरूणीचे नाव आहे . ती तिच्या किंग साईज बेडचा अजब प्रकारे उपयोग करताना दिसत आहे. त्यातच ती याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने कमाईसाठी करत आहे. मुलीचे म्हणणे आहे की कोणतीही व्यक्ती तिच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने घेऊ शकते. पण यासाठी एक महत्त्वाची अट म्हणजे, यासाठी ती व्यक्ती मुलगी असावी, अशी अट आहे.

मुलगी 'बेडमेट' का शोधतेय?

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, अन्या कॅनडातील टोरंटो शहरातील रहिवासी आहे. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक मार्केटप्लेसवर एक व्हिडिओ शेअर केला आहे आणि सांगितले आहे की ती 'बेडमेट' शोधत आहे. अन्या सांगते की टोरंटो हे खूप महागडे शहर आहे, जिथे खोलीचे भाडे इतके जास्त आहे की सामान्य माणसाला ते परवडणे कठीण होते. म्हणूनच मुलगी एक रूममेट शोधत आहे, जी तिच्यासोबत तो बेड शेअर करू शकेल.

आणखी अटी काय?

बेड शेअर करण्यासाठी मुलीने पहिली अट ठेवली आहे की तिचा 'बेडमेट' ही मुलगी असावी आणि तिला तिच्यासोबत किमान एक वर्ष राहावे लागेल. तिला बेडचा अर्धा भाग मिळेल. यासाठी तिने महिन्याला सुमारे ७५ हजार रुपये भाडे ठेवले आहे, जे लोकांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे बऱ्याच लोकांना हे 'डील' मान्यच नाही असं दिसत आहे.

Web Title: woman charges rupees 75 thousand rent to share her bed in Toronto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.