पतीला दुसऱ्या पुरूषासोबत रोमान्स करताना बघून संतापली पत्नी, त्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 09:07 AM2024-04-10T09:07:14+5:302024-04-10T09:07:57+5:30

नुकतंच एका महिलेला तिच्या पतीने तिला दिलेला दगा आणि त्याच्याबाबत सत्य समजलं ज्यामुळे ती चांगलीच संतापली.

Woman caught husband snogging another man revenge confetti made him regret | पतीला दुसऱ्या पुरूषासोबत रोमान्स करताना बघून संतापली पत्नी, त्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि मग...

पतीला दुसऱ्या पुरूषासोबत रोमान्स करताना बघून संतापली पत्नी, त्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि मग...

जगभरातून विवाहित जोडपी किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्यातील दगा दिल्याच्या वेगवेगळ्या घटना नेहमीच समोर येत असतात. एकाने दुसऱ्याला दगा दिला तर दुसरा एकतर नशीबाला दोष देत रडत बसतात नाही तर मग सूड घेण्याचा विचार करतात. काही लोक तर सोशल मीडियावरून काहीतरी लिहून त्यांचे सीक्रेट सगळ्यांसमोर आणतात.

नुकतंच एका महिलेला तिच्या पतीने तिला दिलेला दगा आणि त्याच्याबाबत सत्य समजलं ज्यामुळे ती चांगलीच संतापली. अशात तिने सूड घेण्याचा विचार केला.
30 वर्षीय महिलेने रेडीटवर पोस्ट करत सांगितलं की, तिने तिच्या पतीला त्यांच्याच घराबाहेर एका पुरूषासोबत मेक आउट करताना पाहिलं. हे तिच्यासाठी हैराण करणारं होतं कारण महिला पतीला आतापर्यंत स्ट्रेट समजत होती.

महिलेने सांगितलं की, पती जेव्हा घरात आला तेव्हा तिने त्याला काही विचारलं नाही. ती शांत राहिली. पण नंतर मी त्याचा पाठलाग करणं सुरू केलं. यादरम्यान तिने पती आणि त्या दुसऱ्या पुरूषाला अनेक ठिकाणी सोबत पाहिलं. तिने त्यांचे फोटो काढले जेणेकरून तिला पुरावे सादर करता यावे.

शेवटी तिच्या रागाचा बांध फुटला आणि ती पतीच्या ऑफिसमध्ये पोहोचली. इथे तिने सगळ्यांसमोर पतीच्या तोंडावर ते फोटो फेकले आणि रागाने तिथून निघून गेली. महिलेने पुढे सांगितलं की, माझ्या बायसेक्शुअल बहिणीला जेव्हा हे समजलं तेव्हा ती म्हणाली की, तू ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांसमोर असं करायचं नव्हतं. 

तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या की, तू जरा जास्तच ड्रामा केला. इतकं करण्याची गरज नव्हती. दुसऱ्याने लिहिलं की, रिलेशनशिपमधील समस्या चव्हाट्यावर मांडण्याची ऑफिस ही जागा नाही. तू चुकलीस.

Web Title: Woman caught husband snogging another man revenge confetti made him regret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.