पैशांसाठी पत्नीने पतीला घराबाहेर काढलं, अपघातात पाय गमावल्यावर सोडली त्याची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:47 IST2023-08-18T16:46:47+5:302023-08-18T16:47:31+5:30

Shocking News: 2017 मध्ये एका अपघातात त्याचे पाय कापले गेले. त्याआधी पैसे कमावून त्याने जमीन खरेदी केली होती.

Wife threw his husband out of the house in alwar Rajasthan | पैशांसाठी पत्नीने पतीला घराबाहेर काढलं, अपघातात पाय गमावल्यावर सोडली त्याची साथ

पैशांसाठी पत्नीने पतीला घराबाहेर काढलं, अपघातात पाय गमावल्यावर सोडली त्याची साथ

Shocking News: अलवरच्या नौगाव भागातील कोटाकला गावातून 48 वर्षीय एक व्यक्ती मिनी सचिवालयात पोहोचला. इथे रडत रडत त्याने सांगितलं की, त्याचं मूळ गाव भरतपूर डीगमध्ये येतं. 25 वर्षाआधी त्याने कोटाकला गावातील जाहिदासोबत लग्न केलं होतं. तिला आधीच एक मुलगी होती. तरीही तो तिच्यासोबत तिच्या माहेरी राहू लागला होता. 2017 मध्ये एका अपघातात त्याचे पाय कापले गेले. त्याआधी पैसे कमावून त्याने जमीन खरेदी केली होती.

अपघातात पाय कापले गेल्यानंतर आता पत्नी आपल्या पतीला सोबत ठेवण्यास नकार देत आहे. त्यांना मुलही आहेत. ते पत्नीच्या मनानुसार चालतात. आता या व्यक्तीला पत्नीने धक्के मारून घरातून काढलं. पोलिसांकडेही त्याने तक्रार केली. पण त्याचं कुणी ऐकलं नाही. पत्नीने घरातून मारहाण करून काढलं. मुलंही त्याची साथ देत नाहीयेत.

दिव्यांग पतीचा आरोप आहे की, तो स्वत:चं गाव सोडून पत्नीच्या माहेरी राहत होता. त्याने सगळंकाही ठीक असेपर्यंत चांगली कमाई केली. अपघातानंतर क्लेममध्ये त्याला 14 लाख रूपये मिळाले. तेही त्याच्या पत्नीने हिसकावले. जी जमीन खरेदी केली होती ती सुद्धा पत्नीच्या नावाने केली होती. ती तिने विकली. आता पत्नी मनात येईल तिथे राहते. तो म्हणाला की, त्याला त्याचा अधिकार हवा आहे. जेणेकरून मूळ गावी परत जाऊ शकेल.

Web Title: Wife threw his husband out of the house in alwar Rajasthan