'तू म्हातारा झालास...' असं पतीला म्हणत महिला मुलगा-दागिने घेऊन प्रियकरासोबत फरार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 15:03 IST2024-05-01T15:01:35+5:302024-05-01T15:03:16+5:30

पतीने सांगितलं की, लग्न झाल्यापासूनच पत्नी त्याला म्हातारा झाल्याचा टोमणा मारत होती आणि...

Wife left husband and run away with lover in Bihar | 'तू म्हातारा झालास...' असं पतीला म्हणत महिला मुलगा-दागिने घेऊन प्रियकरासोबत फरार...

'तू म्हातारा झालास...' असं पतीला म्हणत महिला मुलगा-दागिने घेऊन प्रियकरासोबत फरार...

बिहारच्या मुजफ्फरपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एक महिला पतीला सोडून तिच्या प्रियकरासोबत फरार झाली. इतकंच नाही तर ती सोबत मुलाला, घरातील दागिने आणि पैसेही घेऊन गेली. पतीने सांगितलं की, लग्न झाल्यापासूनच पत्नी त्याला म्हातारा झाल्याचा टोमणा मारत होती आणि माझ्यापासून दूर राहण्याचं कारण शोधत होती. दोन वर्षाआधीच दोघांचं लग्न झालं होतं. आता पतीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, गुड्डू आणि सबीना खातून यांचं जानेवारी 2022 मध्ये लग्न झालं होतं. त्यानंतर दोघेही आनंदाने संसार करू लागले होते. नंतर त्यांना एक मुलगा झाला. गुड्डू घरातून बांगड्यांचं काम करत होता. अशात पत्नी त्याला दुसऱ्या शहरात जाऊन काम करण्याचं म्हणत होती. 

गुड्डूने सांगितलं की, नंतर त्याने भावाच्या दुकानातून राहून काम करण्यास सुरूवात केली होती. 25 एप्रिलला घरातून कामासाठी बाहेर निघाला. दुपारी काही कामासाठी त्याने एका मुलाला घरी पाठवलं. तर घराचा दरवाजा बंद होता. याची माहिती त्या मुलाने गुड्डूला दिली. गुड्डू घरी आल्यावर त्याला समजलं की, बाइकवरून आलेल्या एका तरूणासोबत सबीना पळून गेली आणि मुलालाही घेऊन गेली.

गुड्डू सासरी फोन करूनही विचारपूस केली. तर ती तिथेही गेली नव्हती. नंतर आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात आले. घराच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी केली तर समजलं की, सबीनाचं एका तरूणसोबत अफेअर सुरू होतं. यानंतर गुड्डूने पोलिसात तक्रार दाखल केली.

गुड्डूने पोलिसांना सांगितलं की, लग्न झाल्यापासूनच सबीना त्याला म्हातारा म्हणत होती. मी घरी आल्यावर कसंतरी लॉक तोडलं आणि आत जाऊन पाहिलं तर ती घरातील दागिने आणि पैसेही घेऊन गेली होती. मला समजलं की, पत्नीचे प्रेमसंबंध होते. तो घरी नसताना एक तरूण त्याच्या घरी येत होता. हे जवळपास 3 महिन्यांपासून सुरू होतं. आजूबाजूच्या लोकांना तिने हा तरूण तिचा भाऊ असल्याचं सांगितलं होतं. पोलीस पुढील चौकशी करत आहेत. 

Web Title: Wife left husband and run away with lover in Bihar