मसाज पार्लरमधून पती घरी घेऊन आला असा आजार, महिलेने घेतला घटस्फोटाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 17:29 IST2022-01-14T17:24:37+5:302022-01-14T17:29:03+5:30
'डेली स्टार' च्या वृत्तानुसार, कॅनडातील रिचमंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची कहाीणी लोकांसोबत शेअर केली आहे.

मसाज पार्लरमधून पती घरी घेऊन आला असा आजार, महिलेने घेतला घटस्फोटाचा निर्णय
लग्नाच्या नात्यातील विश्वास तोडणं आयुष्यभरासाठी त्रासाचं कारण बनतं. कॅनडातील (Canada) एका कपलसोबत असंच झालं. नात्यात पती पत्नीला दगा देत होता आणि शेवटी अशा अडचणीत सापडला की, ज्याची भरपाई करणं त्याला शक्य झालं नाही.
पार्लरमध्ये चालत होता बेकायदेशीर धंदा
'डेली स्टार' च्या वृत्तानुसार, कॅनडातील रिचमंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या नात्याची कहाीणी लोकांसोबत शेअर केली आहे. महिलेने सांगितलं की, तिचा पती मसाज पार्लरवर जाऊन वर्कर्ससोबत संबंध ठेवत होता. असे पार्लर विना लायसन्स देहविक्रीचा व्यवसाय करतात. आणि इथे काम करणाऱ्या महिलांची कोणतीही मेडिकल टेस्ट होत नाही.
महिलेने पुढे सांगितलं की, पतीही हीच सवय त्याच्यासाठी समस्येचं कारण ठरली. कारण मसाज पार्लरमुळे तो सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणजेच STI चा शिकार झाला. जर पतीच्या या आजाराबाबत समजलं नसतं तर पार्लरमध्ये जाण्याच्या त्याच्या सवयीबाबतही समजलं नसतं.
महिलेने घेतला घटस्फोटाचा निर्णय
आपलं नाव सीक्रेट ठेवत महिलेने सांगितलं की, पती मसाज पार्लरमध्ये केवळ मसाजसाठी नाही तर तेथील महिलांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जात होता. महिला म्हणाली की, पतीला झालेला आजार अजून तिला झाला नाही. पण पतीच्या दग्यामुळे महिलेने त्याला घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महिलेने लिहिलं की, पतीला जेव्हा याबाबत विचारलं तेव्हा त्याने अजिबात लाज न वाटू देता सगळं काही सांगितलं. त्याला घटस्फोट घेण्याचा निर्णय सांगितलं तेव्हाही त्याने पार्लरला जाण्याची सवय सोडली नाही. महिलेला घटस्फोटाआधी पतीबाबत माहिती जमा करायची होती. त्यामुळे स्वत: पार्लरला जाऊन सगळी माहिती घेतली.
मसाज पार्लरमधील महिलांना हे मान्य केलं की, महिलेचा पती इथे येत होता. पण त्यापुढचं त्या सांगायला तयार नव्हत्या. पार्लरमधील लोकांचा दावा आहे की, इथे कोणतंही चुकीचं काम होत नाही. इथे मसाजसाठी लायसन्स मिळालं आहे. हे पार्लर पहिल्यांदाच नाही तर याआधी वादात सापडलं होतं.
हे पण वाचा :
ज्या मुलाला आई गर्भातच मारून टाकणार होती, तो आज आहे जगातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉलर!