माहेरी जाऊन पत्नीने गपचूप केलं दुसरं लग्न, सासरी जाताच पतीला बसला धक्का आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 10:09 IST2023-07-07T10:08:52+5:302023-07-07T10:09:06+5:30

Weird News : एक वर्षाआधी पती काही न सांगता पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली. जेव्हा तो सासरी पोहोचला तेव्हा त्याला समजलं की, त्याच्या पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. 

Wife cheated husband married with other person secretly in Maayka | माहेरी जाऊन पत्नीने गपचूप केलं दुसरं लग्न, सासरी जाताच पतीला बसला धक्का आणि मग...

माहेरी जाऊन पत्नीने गपचूप केलं दुसरं लग्न, सासरी जाताच पतीला बसला धक्का आणि मग...

UP News: उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यात पत्नीने दगा दिला म्हणून पती आपल्या मुलीला घेऊन एसपी ऑफिसमध्ये न्याय मागण्यासाठी गेला. पतीनुसार, 9 वर्षाआधी त्याचं लग्न झालं होतं. एक वर्षाआधी पती काही न सांगता पत्नी मुलीला घेऊन माहेरी गेली. जेव्हा तो सासरी पोहोचला तेव्हा त्याला समजलं की, त्याच्या पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. 

व्यक्ती आपल्या मुलीला घरी परत घेऊन आला. ज्यानंतर त्याने पोलिसात पत्नी विरोधात तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली. तरूणाची मागणी आहे की, घटस्फोट न घेता पत्नीने दुसरं लग्न केलं. अशात तिच्यावर कारवाई केली जावी. 

हरदोईमध्ये 4 वर्षांच्या मुलीसोबत व्यक्ती पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचली. त्याचं नाव इंद्र भूषण सिंह आहे. तो पत्नीने दगा दिल्याची तक्रार घेऊन पोलिसांकडे आला होता. तो म्हणाला की, 9 वर्षाआधी त्याचं लग्न पूनम नावाच्या तरूणीसोबत झालं होतं. लग्नाच्या 5 वर्षानंतर त्याच्या घरी मुलीचा जन्म झाला. काही वर्ष सगळं काही ठीक सुरू होतं. पण गेल्यावर्षी त्याची पत्नी तो घरी नसताना मुलीला घेऊन माहेरी गेली.

बरेच दिवस ती परत आली नाही तेव्हा तो त्याच्या सासरी पोहोचला आणि त्याला समजलं की, त्याच्या पत्नीने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. पत्नीने लग्न केल्याचं समजल्यावर तो मुलीला घेऊन गावी परतला. 

पत्नीच्या दग्यामुळे तो पत्नीविरोधात कारवाई करण्याची मागणी करत आहे. पोलीस अधिकारी म्हणाले की, इंद्र भूषणने पत्नी विरोधात तक्रार दाखल केली आहे. चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

Web Title: Wife cheated husband married with other person secretly in Maayka