तर अशाप्रकारे सुरू झाली फोनवर 'हॅलो' म्हणण्याची पद्धत, जाणून घ्या आधी काय म्हणायचे...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2019 03:00 PM2019-06-06T15:00:25+5:302019-06-06T15:07:27+5:30

आपण बालपणापासून हे बघत आणि ऐकत आलो आहोत की, फोन उचलताच लोक हॅलो म्हणतात. त्यानंतरच इतर गोष्टी बोलायला सुरूवात केली जाते.

why we say hello first on phone | तर अशाप्रकारे सुरू झाली फोनवर 'हॅलो' म्हणण्याची पद्धत, जाणून घ्या आधी काय म्हणायचे...

तर अशाप्रकारे सुरू झाली फोनवर 'हॅलो' म्हणण्याची पद्धत, जाणून घ्या आधी काय म्हणायचे...

Next

(Image Credit : SteemKR)

आपण बालपणापासून हे बघत आणि ऐकत आलो आहोत की, फोन उचलताच लोक हॅलो म्हणतात. त्यानंतरच इतर गोष्टी बोलायला सुरूवात केली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की, फोन उचलल्यावर लोक सर्वातआधी हॅलोच का म्हणतात? हॅलो व्यतिरिक्त दुसरं काही का बोललं जात नाही? खरंतर याचं उत्तर वेगवेगळ्या आख्यायिकांमध्ये आहे. पण याला सत्याचा काही आधार नाही. पण या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देत आहोत.

(Image Credit : The Art of Manliness)

टेलीफोनचा आविष्कार अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी केला होता. १० मार्च १८७६ मध्ये त्यांना टेलीफोन आविष्काराचं पेटेंट मिळालं. आविष्कार केल्यानंतर बेल यांनी सर्वातआधी त्यांचे मित्र वॉट्सन यांना एक संदेश पाठवला. प्रिय वॉट्सन इथे ये मला तुझी गरज आहे. ग्राहम बेल हे फोनवर बोलताना हॅलो नाही तर Ahoy असं बोलायचे.

टेलीफोनच्या शोधानंतर जेव्हा लोकांनी याचा वापर सुरू केला, तेव्हा लोक सर्वातआधी विचारत होते की, Are you there. हे ते यासाठी करत होते की, त्यांना कळावं की, त्यांचा आवाज दुसरीकडे पोहोचतो आहे. पण असे म्हणतात की, एकदा थॉमसन एडिशन यांनी Ahoy हे चुकीचं ऐकलं आणि १८७७ मध्ये त्यांनी Hello म्हणण्याचा प्रस्ताव ठेवला.

(Image Credit : www.npr.org)

हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी थॉमस एडिसनने पिट्सबर्गच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट अ‍ॅन्ड प्रिंटिंग टेलीग्राफ कंपनीचे अध्यक्ष टीबीए स्मिथ यांना पत्र लिहून सांगितले की, टेलीफोनवर पहिला उच्चारला जाणारा शब्द 'हॅलो' हा असावा. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन केला तेव्हा ते हॅलो असंच म्हणाले. तेव्हापासून फोनवर उचलल्यावर हॅलो म्हणण्याची पद्धत सुरू झाली.

Web Title: why we say hello first on phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.