विमान अपघाताआधी पायलट Mayday - Mayday असं का म्हणतात, काय होतो याचा नेमका अर्थ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 14:51 IST2026-01-29T14:48:34+5:302026-01-29T14:51:42+5:30

Meaning of Mayday Code word : आपणही अनेकदा हा शब्द ऐकला असेलच. पण 'Mayday'या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि कुठून आला? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Why pilot say mayday before any accident what does it mean | विमान अपघाताआधी पायलट Mayday - Mayday असं का म्हणतात, काय होतो याचा नेमका अर्थ?

विमान अपघाताआधी पायलट Mayday - Mayday असं का म्हणतात, काय होतो याचा नेमका अर्थ?

Meaning of Mayday Code word : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं २८ जानेवारी रोजी विमान अपघात निधन झालं. विमान अपघात कशामुळे झाला, त्यांच्यात शेवटचं काय बोलणं झालं हे जाणून घेतलं जात आहे. सोबतच या अपघातानंतर पुन्हा एकदा विमानांसंबंधी वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे. विमान अपघातानंतर एक शब्द अनेकदा चर्चेत राहतो. तो म्हणजे 'Mayday'. हा शब्द पायलट तेव्हा उच्चारतात जेव्हा विमानात काहीतरी गडबड झाली असेल. आपणही अनेकदा हा शब्द ऐकला असेलच. पण 'Mayday'या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि कुठून आला? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Mayday चा अर्थ काय?

'Mayday' एक इमरजन्सी संदेश आहे, जो कोणत्याही विमानात दुर्घटनेत किंवा गंभीर तांत्रिक बिघाडाच्या स्थितीत पायलट एअर ट्रॅफिक कंट्रोलला देत असतात. हा शब्द रेडिओवर लागोपाठ तीन वेळा उच्चारला जातो. 'Mayday, Mayday, Mayday'. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला हे स्पष्टपणे कळावं की, स्थिती फार गंभीर आहे आणि लगेच मदतीची गरज आहे. हा संदेश सामान्यपणे विमानातील तांत्रित बिघाडानंतर, इंजिन फेल झाल्यावर, आग लागल्यावर, कॅबिन प्रेशर डाऊन झाल्यावर, लॅंडिंग गिअर किंवा नॅव्हिगेशन सिस्टीम फेल झाल्यावर किंवा विमानाला क्रॅश लॅंडिंग करायची असेल तेव्हा दिला जातो.

कुठून आला हा शब्द?

Mayday शब्दाचा संबंध फ्रान्ससोबत आहे. १९२० च्या दशकात फ्रान्समधील अॅव्हिएशन रेडिओ ऑफिसर फ्रेडरिक स्टॅनली मॉकफोर्डने या शब्दाला इमरजन्सी सिग्नलच्या रूपात प्रस्तावित केलं होतं. त्यावळी लंडन आणि पॅरिस दरम्यान विमान उड्डाणे खूप वाढली होती आणि फ्रेंच शब्द 'm’aider' ज्याचा अर्थ होतो “help me” म्हणजेच "माझी मदत करा", ने प्रेरित होऊन याला स्वीकारण्यात आलं. नंतर हा शब्द इंटरनॅशनल अॅव्हिएशन कम्युनिकेशचा भाग बनला आणि याला इंटरनॅशनल सिव्हिल अॅव्हिएशन ऑर्गेनायजेशन (ICAO) ने अधिकृत इमरजन्सी कॉल सिग्नल म्हणून मान्यता दिली.  

विमानातील इतरही काही कोडवर्ड

- पॅन-पॅन (Pan-Pan, Pan-Pan, Pan-Pan): याचा अर्थ विमानात समस्या आहे, जी गंभीर आहे पण तात्काळ जीवाला धोका नाही. उदा. वैद्यकीय आपत्कालीन स्थिती किंवा लहान तांत्रिक बिघाड.

- स्क्वॉक 7500 (Squawk 7500): हा कोड तेव्हा वापरला जातो, जेव्हा विमानाचे अपहरण झालेले असते.

- स्क्वॉक 7600 (Squawk 7600): याचा अर्थ विमानाचा रेडिओ किंवा कम्युनिकेशन सिस्टिम बंद पडलेला आहे.

- स्क्वॉक 7700 (Squawk 7700): हा सर्वसाधारण आपत्कालीन परिस्थितीसाठी वापरला जाणारा कोड आहे.

- कोड 300 / एन्जेल (Code 300 / Angel): फ्लाइटदरम्यान एखाद्या प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यासाठी वापरला जाणारा कोड.

- ऑल कॉल (All Call): कॅबिन क्रूला एकमेकांशी किंवा पायलटशी संपर्क साधण्यासाठी सर्व इंटरनल फोन उचलण्याचा संदेश.

- कोड अ‍ॅडम (Code Adam): विमानतळावर एखादे मूल हरवल्यास दिला जाणारा इशारा.

- रॉजर (Roger): पायलट वापरतो तो शब्द, ज्याचा अर्थ संदेश मिळाला आहे.

- स्क्रॅम्बल (Scramble): शत्रूला अडवण्यासाठी किंवा तातडीच्या परिस्थितीत फायटर विमानांना त्वरित उड्डाण करण्याचा आदेश.

Web Title : विमान दुर्घटना से पहले पायलट मेडे क्यों कहते हैं: अर्थ समझाया गया

Web Summary : मेडे एक आपातकालीन कॉल है जो पायलट गंभीर स्थिति में उपयोग करते हैं। फ्रेंच 'm’aider' (मेरी मदद करो) से उत्पन्न, यह तत्काल खतरे का संकेत देता है। स्क्वॉक 7500 (अपहरण) और पैन-पैन (गंभीर लेकिन जानलेवा नहीं) जैसे अन्य कोड भी विमानन संचार के लिए महत्वपूर्ण हैं।

Web Title : Why Pilots Say Mayday Before Plane Crash: Meaning Explained

Web Summary : Mayday is an emergency call pilots use during critical situations. Originating from French 'm’aider' (help me), it signals immediate danger. Other codes like Squawk 7500 (hijacking) and Pan-Pan (serious but not life-threatening issue) are also crucial for aviation communication.