J Letter on Railway Coach : भारतीय रेल्वेने रोज कोट्यावधी लोक प्रवास करतात. रोज रेल्वेकडून १३ हजारांपेक्षा अधिक प्रवासी रेल्वे धावतात आणि ७ हजारांपेक्षा जास्त स्टेशनवर थांबवतात. आपणही अनेकदा रेल्वेने प्रवास केला असेल. रेल्वेने केला जाणारा प्रवास हा वेगवेगळे अनुभव देणारा असतो. अनेकजण तर नेहमीच रेल्वेने प्रवास करतात, पण तरी सुद्धा त्यांना रेल्वेबाबतच्या अनेक गोष्टी माहिती नसतात. जसे की, रेल्वेच्या कोचवर लिहिलेले कोड किंवा अक्षरं. आपणही कधीना कधी पाहिलं असेल की, काही रेल्वेच्या कोचवर ‘J’ अक्षराचं बोर्ड लावलेलं असतं. याचा नेमका काय अर्थ होतो हे जाणून घेऊया.
भारतीय रेल्वेच्या कोचवर बोर्ड का लावतात?
वेगवेगळ्या रेल्वेच्या वेगवेगळ्या कोचवर काही बोर्ड लावलेले असतात. रेल्वेकडून प्रत्येक कोचवर इंग्री लेटरद्वार ओळख दिली जाते. याने प्रवाशांना आपली जागा मिळवण्यास मदत मिळते. तसेच रेल्वेच्या व्यवस्थापानासाठी देखील हे बोर्ड फायदेशीर ठरतात. तसेच कर्मचाऱ्यांना हेही कळतं की, कोणत्या कोचमध्ये कोणती सुविधा दिली जात आहे.
कोणत्या रेल्वेवर असतो ‘J’ चा बोर्ड
‘J’अक्षराचा बोर्ड आपल्याला भारतीय रेल्वेच्या प्रत्येक रेल्वेवर बघायला मिळत नाही. केवळ एकाच रेल्वेवर आपल्याला‘J’हा बोर्ड बघायला मिळतो. या रेल्वेचं नाव आहे गरीब रथ एक्सप्रेस.
कशासाठी असतो हा बोर्ड?
गरीब रथ एक्सप्रेसमध्ये J लिहिलेला बोर्ड बघायला मिळतो. हा बोर्ड चेअर क्लास दर्शवण्यासाठी लावलेला असतो. यात प्रवासी खुर्चीवर बसून प्रवास करतात.
कमी भाड्यात एसी सुविधा देणारी रेल्वे
गरीब रथ एक्सप्रेस रेल्वे कमी भाडे असणारी पण पूर्णपणे एसी असलेली रेल्वे आहे. या रेल्वेत इतर रेल्वेच्या थर्ड एसीच्या तुलनेत ४० टक्के कमी भाडे असतं. हेच कारण आहे की, या रेल्वेला सामान्य लोकांची रेल्वे म्हटलं जातं.
गरीब रथ रेल्वेच्या खासियत
- गरीब रथ रेल्वेत जेवण किंवा झोपायला सीट मिळत नाही. जर आपल्याला ही सेवा हवी असेल तर त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील.
- गरीब रथ एक्सप्रेसची वेळ राजधानी एक्सप्रेसप्रमाणे असते, जी आपल्या फिक्स वेळेवर येण्यासाठी ओळखली जाते.
- गरीब रथ एक्सप्रेसमध्ये राजधानी एक्सप्रेसचे कोचही बघायला मिळतात.
Web Summary : Garib Rath Express coaches feature a 'J' marking, indicating chair car seating. This budget-friendly, fully AC train offers lower fares than other AC trains, making it popular for affordable travel. No complimentary food/bedding; separate charges apply.
Web Summary : गरीब रथ एक्सप्रेस के कोच पर ‘J’ अक्षर चेयर कार को दर्शाता है। यह किफायती एसी ट्रेन है, जिसका किराया अन्य एसी ट्रेनों से कम है। इसमें मुफ्त भोजन/बिस्तर नहीं मिलता, अलग से भुगतान करना होता है।