रेल्वेत जनरल डबा सुरूवातीला आणि शेवटी का असतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 02:29 PM2023-12-28T14:29:43+5:302023-12-28T14:30:28+5:30

रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते.

Why is the general compartment at the beginning and at the end of the train? | रेल्वेत जनरल डबा सुरूवातीला आणि शेवटी का असतो?

रेल्वेत जनरल डबा सुरूवातीला आणि शेवटी का असतो?

Indian Railway : प्रत्येक रेल्वेमध्ये जनरल डबा मधे का लावला जात नाही? जनरल डबा हा नेहमी मागे किंवा पुढच्या बाजूलाच का असतो? असा प्रश्न अनेकांना पडत असेल. तर रेल्वेकडून याबाबतचं प्लानिंग विचार करूनच केलेलं असतं. रेल्वेमध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे डबे लावले जातात, तेव्हाही प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा याची काळजी घेतली जाते.

प्रत्येक रेल्वेचं स्ट्रक्चर जवळपास एकसारखं असतं. म्हणजे इंजिननंतर किंवा सगळ्यात मागे जनरल डबा आणि मधे AC-3, AC-2 आणि स्लीपर कोच लावलेले असतात. जनरल डबे मागे किंवा पुढे लावण्यावर एका प्रवाशाने तर रेल्वेवरच जनरल डबे प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्याचा आरोप लावला आहे. 

ट्विटरवर त्याने आरोप लावला की, रेल्वेचे जनर डबे यासाठी रेल्वेच्या मागे किंवा पुढे असतात जेणेकरून दुर्घटना झाल्यावर सगळ्यात जास्त नुकसान गरीब प्रवाशांचं व्हावं. पण रेल्वे विभागाने त्याचे आरोप फेटाळून लावत सांगितलं की, रेल्वे संचालनाच्या नियमांनुसारच डब्यांची जागा ठरते. यात श्रेणी महत्वाची नसते.

जाणून घ्या कारण...

जनरल डब्यांना या क्रमात प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षा ध्यानात ठेवून लावले जातात. सोबतच जनरल डबे मागे-पुढे लावल्याने रेल्वेचा बॅलन्सही बरोबर राहतो. कोणत्याही रेल्वेच्या जनरल डब्यांमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते. अशात जर जनरल डबे मधे असले तर जास्त भार मधे पडेल आणि यामुळे रेल्वेचं संतुलन बिघडू शकतं. असं झालं तर बोर्ड-डीबोर्डमध्ये अडचण येऊ शकते. जनरल डबे मधे ठेवले तर सिटींग अरेंजमेंटसोबत इतर व्यवस्थाही व्यवस्थित होणार नाही. यामुळे प्रवाशी त्यांचं सामान घेऊन एकीकडून दुसरीकडे जाऊ शकणार नाहीत. याच कारणाने जनरल डबे प्रवाशांच्या सोयीसाठी दोन कोपऱ्यांवर लावले जातात.

इमरजन्सी

रेल्वे एक्सपर्ट्स यांचं यावर मत आहे की, जनरल डबे रेल्वेच्या दोन्ही टोकांवर असणं सेफ्टीच्या दृष्टीनेही चांगलं आहे. असं केल्याने जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी अंतरामुळे दोन भागांमध्ये विभागली जाते. याने कोणत्याही आपातकालीन स्थितीत लोकांना रेल्वेतून बाहेर निघणं सोपं होतं.

Web Title: Why is the general compartment at the beginning and at the end of the train?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.