ना वर ट्रॅफिक असतं, ना ओव्हरटेक करायचं असतं; मग विमानात हॉर्न कशासाठी लावतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 15:26 IST2025-07-03T15:25:57+5:302025-07-03T15:26:24+5:30

Horn in Airplane : अनेकांना हे माहीत नसतं की, विमानाला सुद्धा हॉर्न लावलेला असतो. त्यामुळे आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो की, विमानात हॉर्न का आणि कशासाठी लावले जातात?

Why is airplanes also have horns, know when and under what conditions do pilots blow it | ना वर ट्रॅफिक असतं, ना ओव्हरटेक करायचं असतं; मग विमानात हॉर्न कशासाठी लावतात?

ना वर ट्रॅफिक असतं, ना ओव्हरटेक करायचं असतं; मग विमानात हॉर्न कशासाठी लावतात?

Horn in Airplane : बाइक असो, कार असो, ट्रक असो वा रेल्वे असो, इतकंच काय तर सायकलला सुद्धा हॉर्न असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. गाड्यांना हॉर्न असणं फार महत्वाचं असतं, कारण याद्वारे गाडी चालवत असताना आपण लोकांना सतर्क करत असतो. जेणेकरून कोणतीही दुर्घटना टाळता यावी. हॉर्नचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तुम्ही ऐकले असतील. रेल्वे सुद्धा प्लॅटफॉर्महून निघताना, थांबताना हॉर्न वाजवते. पण आपण कधी विमानात असलेल्या हॉर्नबाबत ऐकलंय का? नसेल ऐकलं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, विमानाला सुद्धा हॉर्न लावलेला असतो. त्यामुळे आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो की, विमानात हॉर्न का आणि कशासाठी लावले जातात? पाहुया याचं कारण...

'या' कारणानं लावला जातो हॉर्न

सगळ्यात आधी तर हे लक्षात ठेवा की, विमानातील हॉर्नचा वापर दुसऱ्या विमानाला रस्त्यातून बाजूला करण्यासाठी केला जात नसतो. कारण एकाच रूटवर दोन विमानं समोरासमोर येण्याची शक्यता नसते. त्याशिवाय विमानातील हॉर्नचा वापर पक्ष्यांना पळवून लावण्यासाठीही केला जात नाही. 

मुळात विमानातील हॉर्नचा वापर ग्राउंड इंजिनिअर आणि स्टाफसोबत संपर्क करण्यासाठी केला जातो. जर विमानात उड्डाण घेण्याआधी काही गडबड झाली असेल किंवा एखादी इमरजन्सीसारखी स्थिती आली असेल तेव्हा विमानाचे पायलट हॉर्न वाजवून ग्राउंड इंजिनिअर अलर्ट मेसेज देतात.

कुठं लावला असतो हॉर्न?

विमानातील हॉर्न लॅंडिंग गिअरच्या कम्पार्टमेंटमध्ये लावलेला असतो आणि याचं बटन विमानाच्या कॉकपिटमध्ये असतं. या बटनावर जीएनडी असं लिहिलेलं असतं. हे बटन दाबल्यावर विमानाचं अलर्ट सिस्टीम चालू होतं आणि यातून सायरनसारखा आवाज येतो. 

विमानातील ऑटोमॅटिक हॉर्नच्या आवाजात का असतो फरक?

विमानात ऑटोमॅटिक हॉर्नही लावलेले असतात, जे सिस्टीममध्ये काही बिघाड झाल्यावर किंवा आग लागल्यावर आपोआप सुरू होतात. याची खास बाब म्हणजे या हॉर्नचा आवाजही वेगळा असतो. सिस्टीममध्ये काय बिघाड झालाय त्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारे वाजतात. या आवाजावरून एअरक्राफ्ट इंजिनिअरला हे समजतं की, विमानातील कोणत्या भागात बिघाड झाला आहे. 

Web Title: Why is airplanes also have horns, know when and under what conditions do pilots blow it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.